
संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण ताजं असताना, बीडमध्ये एकामागून एक प्रकरणं आता उघड होत आहे. शिवाय या प्रकरणांच्या तपासालाही चालना मिळताना दिसत आहे. परळीतील बापू आंधळे खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता बबन गित्ते याची संपत्ती जप्त होण्याची शक्यता आहे. गित्ते हा खून झाल्यानंतर आजपर्यंत फरार आहे. तो पोलीसांना सापडलेला नाही. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून त्याची संपत्ती जप्त करण्याताबाबत प्रशासनाने पावलं उचलली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बबन गित्तेची संपत्ती किती आहे याची माहिती पोलिसांनी जमा केली आहे. ही संपत्ती जप्त करण्यासाठी ही परवानगी मागितली जाणार आहे. संपत्ती जप्त केल्यानंतर गित्तेचे आर्थिक स्त्रोत बंद होती. त्यामुळे त्याला अटक करणे सहज शक्य होवू शकेल. 29 जून 2024 रोजी परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांचा खून झाला होता. या प्रकरणात आठ महिन्यांपासून बबन गित्ते फरार आहे. बबन गित्ते याला अधिकृतरित्या फरार घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर त्याच्या संपत्ती जप्तीचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - HoneyTrap: हनी ट्रॅप म्हणजे काय? तो कोणासाठी असतो? या ट्रॅपमध्ये 'ते' कसे अडकतात?
यासाठी त्याच्या संपत्तीची माहिती जमा केली जात आहे. पुढील दोन दिवसात न्यायालयाकडे संपत्ती जप्तीसाठी परवानगी मागितली जाणार आहे. त्यामुळे बबन गित्ते याच्या संपत्तीवर टाच येणार आहे. त्यामुळे शरणागती शिवाय बबन गित्तेकडे कुठलाही पर्याय राहणार नाही, असं पोलीसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात तपास पूर्ण करून पोलिसांनी दोषारोपपत्र अंबाजोगाई न्यायालयात दाखल केलेले आहे.
ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...
बबन गित्तेच्या अटकेनंतर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान आंधळे खून प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दिल्या गेल्या होत्या. एकूण 11 जणांवर गुन्हा नोंद होता. यात वाल्मीक कराड विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि कट रचल्या प्रकरणी गुन्हा नोंद आहे. मात्र परळी पोलिसांनी तपासात वाल्मीक कराडचा सहभाग नसल्याचे सांगून त्याचे नाव आरोपीतून वगळले आहे. उर्वरित आरोपी अटक असून केवळ बबन गित्ते फरार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world