
विनोद जिरे, बीड: सध्या बीड जिल्ह्यासह राज्यात चर्चेत असणारा विषय म्हणजे वाल्मीक कराड आणि बबन गित्ते यांच्यात वाद नेमका काय होता ? त्याला कारणही तसच आहे, ते म्हणजे काल बीड जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये मारहाणीची घटना घडली अन् त्यामध्ये वाल्मीक कराडला महादेव गित्ते याने मारलं. असं सुरेश धस म्हणाले..त्यामुळं या कराड - गित्तेमध्ये नेमका वाद काय झाला? का वैर आले ? पाहुयात या नेमक काय आहे प्रकरण ? या स्पेशल रिपोर्टमधून..
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बबन गित्ते- वाल्मीक कराडची दोस्ती..
वाल्मीक कराड आणि बबन गित्ते हे दोघेही गोपीनाथराव मुंडे यांचे फॉलोवर्स होते. मात्र दुर्दैवाने गोपीनाथराव मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे 2 गट पडले. यानंतर कराड आणि गीते यांचे देखील दोन गट पडले. महत्त्वाचं म्हणजे वीस - पंचवीस वर्षापूर्वी संगीत डिगोळे खून प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून बबन गीते होते ते अनेक वर्ष तुरुंगात होते. ज्यावेळेस बबन गित्ते बाहेर आले, त्यानंतर त्यांनी सामाजिक काम केलं आणि राजकारणात आले. धनंजय मुंडे यांनी एक चांगला सहकारी आपल्याबरोबर येतोय म्हणून बबन गित्तेंना आपल्या सोबत घेतले.
राजकारणामुळे वाद..
गेल्या पंचवार्षिक पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडून देखील आणलं. परळीच्या पंचायत समितीच्या पदावर गित्ते यांच्या पत्नीला सभापती म्हणून बसवलं..यादरम्यान बबन गित्तेच्या पत्नीचा एक चांगला कारभार सुरू होता. मात्र अचानक पणे का कुणास ठाऊक परंतु धनंजय मुंडेच्या गटाने आणि पंकजा मुंडेच्या गटाने दोघांनी मिळून बबन गीतेच्या पत्नीवर अविश्वास ठराव आणला. तो अविश्वास ठराव आणल्यानंतर बबन गित्तेच्या परिवाराविषयी आक्षेपार्ह विधान करण्यात आले. या सर्व प्रकारामागे वाल्मीक कराडचा हात आहे, अशी मानसिकता बबन गीतेची झाली आणि या मधूनच दोघांमध्ये वैर निर्माण झाले.
(नक्की वाचा - Gold Price : सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर; एक तोळ्याची किंमत 91 हजारांवर)
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बबन गित्ते याच्याकडे धनंजय मुंडेंसमोरील पर्याय म्हणून पाहिले जात होते. बबन गित्तेनेही तब्बल 700 गाड्यांचा ताफा घेऊन येत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवारांनीही बबन गित्ते याला प्रदेश उपाध्यक्ष पद देत विधानसभा उमेदवारीचे संकेत दिले होते. मात्र त्याआधीच बापू आंधळे खून प्रकरणात त्याचे नाव आले. हे आरोपही वाल्मीक कराडच्या सांगण्यावरुनच झाल्याचे लोक सांगतात.
एकमेकांना संपवण्याची शपथ...
महत्त्वाचं म्हणजे बबन गित्ते आणि वाल्मीक कराडचा संघर्ष ईतका टोकाचा आहे की दोघांनीही एकमेकांना संपवण्याची शपथ घेतली आहे. म्हणूनच जोपर्यंत वाल्मीक कराडला संपवणार नाही तोपर्यंत दाढी करणार नाही अशी शपथ बबन गित्तेने घेतली आहे तर जोपर्यंत बबन गित्तेला संपवत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी शपथ वाल्मीक कराडने घेतली आहे.
दरम्यान वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेलमध्ये आहे. तर दुसरीकडे बबन गित्ते हा बापू आंधळे खून प्रकरणात फरार आरोपी आहे..त्यामुळं आता या दोघांमधील वाद कधी क्षमनार ? की हा वाद पुन्हा एका नव्या वळणावर जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world