जाहिरात

Buldhana Crime: 'प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवतो..', शिक्षकाने विद्यार्थिनीला रुमवर नेलं, अत्याचार केले अन्...

या घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनीदेखील सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत असून नराधम शिक्षकाला कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे.

Buldhana Crime: 'प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवतो..', शिक्षकाने विद्यार्थिनीला रुमवर नेलं, अत्याचार केले अन्...

अमोल सराफ, बुलढाणा:

Buldhana Crime News: गुरु- शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बुलढाण्यामधून समोर आली आहे. प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवून देतो असे सांगत विद्यार्थिनीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनीदेखील सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत असून नराधम शिक्षकाला कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे.

नराधम शिक्षकाने नको ते केलं....

समोर आलेल्या माहितीनुसार, माझ्याकडे पॉलिचे पुस्तक आहे. नोट्स आहे ते मी तुला देतो व तुझे प्रॅक्टिकल्सचे मार्क्स वाढून देण्यास सांगतो अशी बतावणी करून 16 वर्षीय तरुणीसोबत शिक्षकानेच शारीरिक संबंध ठेवल्याचे तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून शिक्षकासह दोन आरोपींविरुद्ध पोस्को अंतर्गत मलकापूर शहर पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील एका आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Akola News : अकोल्यात 13 वर्षांच्या मुलीनं संपवलं आयुष्य, शाळेतील 'त्या' प्रकरणामुळे उचललं टोकाचं पाऊल!

पिडीतेच्या तक्रारीनुसार, आरोपी मुकेश परमसिंग रबडे (वय वर्ष 40 रा. तरोडा तालुका मोताळा) या शिक्षकाची आणि  विद्यार्थिनीची ओळख होती. शिक्षकाने तरुणीला मोबाईलवर कॉल करून तुझे प्रॅक्टिकल्सचे मार्क्स वाढवून देण्यास सांगतो असे सांगून मलकापूर येथील तहसील चौक येथे बोलावले. त्यानंतर गाडीवर बसवून  बुलढाणा रोडवरील पंचमुखी जवळील एका खोलीत नेले. त्याठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केले तसेच त्याचे रेकॉर्डिंगही केले. 

वारंवार त्रास, व्हायरल करण्याची धमकी..

 आरोपी मुकेश रबडे याने पीडित विद्यार्थी तरुणीला मारहाण करुन जबरदस्तीने वारंवार शरीर संबंध प्रस्थापित केले, त्याचे अश्लील व्हिडिओही काढले. त्यानंतर तिला तहसील चौक येथे आणून सोडून दिले. याबाबत कुठे वाच्यता केली तर व्हिडिओ, स्क्रीन रेकॉर्डिंग व्हायरल करु अशी धमकी दिली.  यानंतर आरोपी रबडे याने अनेक वेळा त्या तरुणीला फोन केले.

मात्र  पीडित तरुणीने फोन न उचलल्यामुळे तो धमकी देऊ लागला. या त्रासाला कंटाळून  तरुणीने तिचे वडील भाऊ यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरुद्ध  विविध कलमां अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

( नक्की वाचा : Pune News : एक बाई आणि 12 भानगडी! ॲसिड हल्ला ते पुरुषांशी जबरदस्तीनं जवळीक, 'या' बाईची संपूर्ण पुण्यात चर्चा )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com