जाहिरात

Crime News: गणेशोत्सवाचे ढोल ठेवण्यावरुन वाद, जीवघेण्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; संभाजीनगरमध्ये खळबळ

जमीन मालकाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Crime News: गणेशोत्सवाचे ढोल ठेवण्यावरुन वाद, जीवघेण्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; संभाजीनगरमध्ये खळबळ

छत्रपती संभाजीनगर: देशभरात गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. मात्र त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागलं आहे. जागेच्या वाद सुरू असतानाच याच जागेवर गणेश उत्सवाला लागणारे ढोल ठेवण्यावरून पुन्हा वाद झाला. त्यानंतर जमीन मालकाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगरच्या एन-6 भागातील संभाजी कॉलनीतील ही घटना आहे. प्रमोद पाडसवान असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांचे वडील रमेश जगन्नाथ पाडसवान आणि प्रमोद यांचा मुलगा रुद्राक्ष पाडसवान गंभीर जखमी झाले. तर, याप्रकरणी ज्ञानेश्वर काशीनाथ निमोने, गौरव काशीनाव निमोने, सौरव काशीनाथ निमोने, काशीनाथ येडू निमोने, शशिकला काशीनाथ निमोने व जावई मनोज दानवेसह अन्य आरोपींवर सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Kolhapur Crime: कोल्हापुरमध्ये दोन गट भिडले! तुफान राडा अन् दगडफेक; नेमकं काय घडलं?

नेमकं काय घडलं?

पाडसवान यांच्या घराच्या समोरच असलेला सिडकोचा प्लॉट त्यांनी काही वर्षांपूर्वी विकत घेतला. गणेश मंडळाचा उत्सव पाडसवान यांच्या याच प्लॉटवर साजरा करण्यात येतो. या गणेश मंडळाचे अध्यक्ष निमोने असल्याने पाडसवान यांना त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी निमोने कुटुंब नेहमी खोडा घालायचा. त्यांनी त्याच प्लॉटवर मंडळाचे ढोल ठेवण्यासाठी शेड टाकले होते. 

सिडकोकडे अतिक्रमणाची रीतसर तक्रार केल्यावर एप्रिल महिन्यात त्यांनी हे अतिक्रमण हटवले होते. त्यानंतर १५ ते २० दिवसांपूर्वी त्याने पुन्हा त्याच ठिकाणी ढोल आणून ठेवले.  त्यातून पाडसवान आणि निमोने कुटुंबांत वाद झाला, गणेशोत्सव जवळ येत असल्याने त्यांच्यातील वाद वाढत होता. पाडसवान कुटूंबाने बांधकामासाठी आणलेले साहित्य त्या ठिकाणी पडलेले होते. 

Live In Murder : लिव्ह-इन पार्टनरचा क्रूर शेवट! लग्नाच्या मागणीवरून प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे केले 7 तुकडे

पण साहित्य बाजूला करून घ्या आम्हाला तिथे कार्यक्रम करायचा असे म्हणून निमोने त्यांच्यावर दबाव टाकायचे. याच रागातून आणि निमोने कुटुंबाचे राजकीय तगडे सबंध आणि त्यातून वाढलेल्या दादागिरीनंतर त्यांनी पाडसवान कुटूंबावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये  प्रमोद पाडसवान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com