Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधील जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेने एक मोठा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला आहे. किराडपुरा भागातील एका गोदामात बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला रेशनिंगचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत रेशनिंगचे धान्य आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन असा एकूण १७ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गरिबांच्या रेशनिंगवर डल्ला
गरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्या काळ्याबाजारवाल्यांचे धाबे यामुळे दणाणले आहेत. या धाडसत्रात केवळ रेशनच्या धान्याचाच काळाबाजार उघड झाला नाही, तर त्याहूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाल विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडीतील ६ महिने ते ३ वर्षांच्या मुलांसाठी आणि गरोदर मातांसाठी शासनाकडून मोफत दिला जाणारा 'अन्नपूर्णा' पोषण आहारही या माफियांच्या गोदामात सापडला.
१ किलोच्या प्लास्टिक पॅकिंग फोडून त्यातील तांदूळ आणि मिक्स पावडर गोण्यांमध्ये पलटी केली जात असतानाच रंगेहात पकडण्यात आले. धक्कादायक म्हणजे सगळा गोरखधंदा इस्लाम पार्टीचा नेता कलीम कुरेशी चालवत होता तो सद्या फरार आहे. तर पोलिसांनी समीर बाबर कुरेशी, फहाद लईक शुतरी आणि फरदीन गणी पठाण या तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
1 लिटर पेट्रोल विकून भारत सरकार किती कमावतं? तेल कंपनी, पंप चालक यांना किती कमिशन मिळतं?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world