जाहिरात

Crime News: उच्चभ्रू वसाहतीत नको तो प्रकार! पोलिसांचा पंटरच ग्राहक बनून गेला अन्.. संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई

सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांना माहिती मिळाली. सहाय्यक आयुक्तांनी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांना कारवाईच्या सूचना दिल्या.

Crime News: उच्चभ्रू वसाहतीत नको तो प्रकार! पोलिसांचा पंटरच ग्राहक बनून गेला अन्.. संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या नंदनवन कॉलनी या उच्चभ्रू सोसायटीतील आपारमेंटच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा छावणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका पीडित महिलेची सुटका करून आंटीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिनाज उस्मान बेग वय ४५ असे अटक करण्यात आलेल्या आंटीचं नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळख असलेल्या नंदनवन कॉलनीतील विठ्ठल विशाखा अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमध्ये महिला वेश्या व्यवसाय करत आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांना माहिती मिळाली. सहाय्यक आयुक्तांनी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांना कारवाईच्या सूचना दिल्या.

Crime News: उल्हासनगरात दरोडेखोरांचा हैदोस! रिक्षातून जाणाऱ्या तरुणाला लुटलं, चाकू दाखवत पलायन

वरिष्ठांच्या आदेशानुसार विवेक जाधव यांनी पोलीस उपनिरीक्षक नागवे यांच्यासह महिला दक्षता समितीच्या सदस्यांसह टीम तयार केली. पंटरला फ्लॅटमध्ये पाठवले.  व्येश्या व्यवसाय चालवणारे मीनाज बेग हिच्याशी सौदा करत दोन हजार रुपये ठरले. मिनाज हिने एक महिला पंटरसोबत बेडरूममध्ये पाठवली. ठरल्याप्रमाणे पंटरने बेडरूम मध्ये जाताच मिस कॉल मारला.

त्यानंतर पथकाने फ्लॅटमध्ये छापा मारला. यावेळी एका पीडित महिलेची सुटका केली. याप्रकरणी हमालदार जालिंदर मांटे यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आंटी मिनाज बेग हिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रेखा लोंढे करीत आहेत.

Dhule News: भर दिवसा 2 पोलिसांना मारहाण, कानाखाली मारतानाचा Video होतोय व्हायरल

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com