बदलापूरमध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. बदलापूरच्या एरंजाड गावात एका 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. हे कृत्य करणारा आरोपी ही अल्पवयीन आहे. त्याचे वय 16 वर्ष आहे. या घटनेनं संपुर्ण गाव हादरून गेलं आहे. शिवाय गावकरी संताप व्यक्त करत आहे. याप्रकरणी त्या 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरंजाड गावात 14 जानेवारी रोजी रात्री हा प्रकार घडला. या गावात राहणाऱ्या 16 वर्षीय युवकाने शेजारी राहणाऱ्या 6 वर्षांच्या चिमुकलीला खेळण्याच्या बहाण्याने कडेवर घेतले. त्यानंतर तो त्या चिमुरडीला घेवून गावातल्या बसस्टॉपवर गेला. अजूनबाजूला पाहून नंतर तो त्या चिमुरडीला शेजारील निर्जन ठिकाणी घेवून गेला. तिथे त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले.
यावेळी मुलगी रडू लागल्यानं त्याने तिला पुन्हा घराजवळ आणून सोडलं. दुसऱ्या दिवशी मुलगी घाबरलेली होती. मुलगी शाळेत जायला ही तयार नव्हती. तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन काय झालं ते विचारलं. त्यानंतर तिने शेजारच्या दादाने काल काय केलं, ते सांगितलं. यानंतर मुलीच्या आईने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली.
त्यानुसार पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन आरोपी विरोधात पोक्सो आणि ऍट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. करून त्याला ताब्यात घेतलं. त्याला न्यायालयापुढे हजर केलं असता न्यायालयाने त्याची १४ दिवसांसाठी भिवंडीच्या बालसुधारगृहात रवानगी केली. या प्रकरणामुळे बदलापुरात पुन्हा एकदा संताप व्यक्त होऊ लागला असून या प्रकरणाचा तपास जलदगतीने करून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा ठोठावण्याची मागणी केली जातेय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world