संजय तिवारी: विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये आता सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडींनंतर आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. नरेंद्र मोदी- अमित शहा जो निर्णय घेतील, तो मला मान्य आहे, असे ते म्हणालेत. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदेंचे आभार मानले तसेच त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत तोंडभरुन कौतुकही केले.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
उद्धव ठाकरेंनी भाजपला धोका दिला, हे एकनाथ शिंदेंना न पटल्यामुळे त्यांनी पुन्हा शिवशाहीचे सरकार आणण्याची भूमिका केले. देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून, अजित पवारांची साथ घेऊन डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून पुढे नेण्याकरता काम केले. एकनाथ शिंदेंसारखा एक कणखर नेता महाराष्ट्राला लाभला. त्यांनी महायुतीचा एक चेहरा म्हणून मोठे काम उभे केले.
महायुतीचे नेते म्हणून एकनाथ शिंदेंनी घेतलेली भूमिका ही खऱ्या अर्थाने राज्याच्या 14 कोटी जनतेकरिता एक मोठी भूमिका आहे. राज्यातील भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. त्यांची भूमिका ही महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे. देवेंद्रजी, अजितदादांच्या अभूतपूर्व विजयात तिन्ही नेत्यांचा वाटा आहे. शिंदेसाहेब लढणारे नाही, लढणारे नेते आहेत. ते रडून राजकारण करत नाहीत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
नक्की वाचा: महायुती सरकारचा 100 दिवसांचा कार्यक्रम ठरणार; शासन दरबारी हालचालींना वेग
महाविकास आघाडीचे नेते महायुतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला. महायुती मजबूत आहे, अभेद्य आहे. मला एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर अभिमान आहे. महायुती म्हणून एकनाथ शिंदेंनी जी भूमिका घ्यायला पाहिजे होती ती त्यांनी मांडली. आमचे केंद्रीय नेतृत्व म्हणजे मोदी आणि शहा. एकनाथ शिंदे यांनीही आमच्या नेतृत्वाचे म्हणणे मान्य केले.
त्यांनी कधीही मागे- पुढे करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांचे मी भारतीय जनता पक्षाकडून खूप खूप अभिनंदन करतो. आमची लढाई मुख्यमंत्रीपदासाठी नाही, १४ कोटी जनतेसाठी आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लढाई सुरु होती आणि आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढत होतो म्हणून जनतेने आम्हाला स्विकारले अन् आम्हाला बहुमत मिळाले. महायुतीमधील तिनही पक्ष पुढे नेण्यासाठी त्यांनी मोठे काम केले आहे. ते आमचे महायुतीचे नेते आहेत, असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.
महत्वाची बातमी: 'एकनाथ शिंदे इतके दिवस गप्प का होते?' काँग्रेसचा एक सवाल अन् अनेक शंका
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world