
सुनीलकुमार कांबळे
गुरू आणि शिष्याचं नातं हे पवित्र असतं. शिष्याच्या जीवनाला मार्ग दाखवण्याचे काम गुरू करत असतात. मात्र लातुरात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका शासकीय विद्यालयातील तीन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. त्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. लातूर शहरापासून नजीक असलेल्या एका सरकारी विद्यालयात ही घटना घडली आहे. त्यामुळे एकीकडे मुली सुरक्षित नसताना आता लहान मुलांच्या सुरक्षेचाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिक्षकी पेशाचा मुखवटा घातलेल्या वासनाधीन नराधमाने विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलांना आपली शिकार बनवली. त्यांच्यावर त्याने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले आहेत. याबाबत कोणाला सांगितलं, तर मी तुम्हाला सोडणार नाही, असा दमही या नराधमाने चिमुरड्या मुलांना दिला होता. त्यामुळे ही मुलं घाबरून गेले होते. त्यातून सलग तीन महिने ते हे अत्याचार सहन करत होते. शिवाय कुणाला सांगितलं तर आपलं काही खरं यांनी या दबावातही ते होते. त्यामुळे त्यांनी याबाबत कुठेही वाच्यता केली नाही.
ट्रेंडिंग बातमी - Walmik Karad : बीड कारागृहात वाल्मीकच बॉस? 'ते' कैदी बाहेर येताच धडाधड बोलले
सोपान कळमकर असं या नराधम शिक्षकाचे नाव आहे. तो शासकीय विद्यालयात हिंदी भाषा शिकवतो. त्यानेच विद्यार्थ्यांसोबत असे घाणेरडे कृत्य केले. याची कुणी कल्पना ही केली नव्हती. मात्र वासनेने बेचैन असलेल्या या नराधम शिक्षकाने आपल्याच शिष्यांना शिकार केलं आहे. हिंदी विषयाच्या शिक्षकानेच तीन विद्यार्थ्यांवर तीन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केला. ऑक्टोबर 2024 ते जानेवारी 2025 या दरम्यानच्या काळात हे अत्याचार करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग बातमी - Chhatrapati Sambhajinagar : आईने रचला लेकाच्या हत्येचा कट, कारणही हादरवणारं!
सोपान राजाराम कळमकर हा अहमदनगरचा आहे. त्याच्या सततच्या अत्याचारामुळे हे तिन्ही विद्यार्थी घाबरून गेले होते. शेवटी त्यांनी याबाबतची तक्रार प्रभारी प्राचार्यांतडे केली. त्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. चौकशी समितीचा अहवाल सादर होताच, प्रभारी प्राचार्य यांच्या फिर्यादिवरून शिक्षक सोपान कळमकर याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. नराधम शिक्षकाला कोर्टात हजर केल्यानंतर 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world