जाहिरात
This Article is From Aug 06, 2024

क्षुल्लक कारणावरुन चिमुकल्यांना अमानुष मारहाण; चीड आणणारा VIDEO समोर

कबुतर चोरल्याचा आरोपावरुन ठेऊन देसाईगंज आयुष अर्जुन स्वर्णकार (18) या युवकाने अमानुषपणे 4 मुलांना लाथा-बुक्यांनी मारहाम केली.

क्षुल्लक कारणावरुन चिमुकल्यांना अमानुष मारहाण; चीड आणणारा VIDEO समोर

मनीष रक्षमवार, गडचिरोली

कबुतर चोरल्याच्या संशयावरून तीन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याची प्रकार गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील राम मंदिर परिसरात समोर आला आहे. या घटनेचा चिड आणणारा व्हिडीओ देखील समोर आला आहे.  व्हिडीओ दिसत आहे की तरुण लहानग्यांना अमानुषपाने लाथा-बुक्यांनी, बांबूने मारत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आयुष स्वर्णकार याला ताब्यात घेतलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

मिळालेल्या माहितीनुसार, कबुतर चोरल्याचा आरोपावरुन ठेऊन देसाईगंज आयुष अर्जुन स्वर्णकार (18) या युवकाने अमानुषपणे 4 मुलांना लाथा-बुक्यांनी मारहाम केली. आर्यन नरेश  बगमारे (9 वर्षे), तन्मय विनोद नागमोती (वय 10 वर्षे), रुषभ विनोद नागमोती (वय 9 वर्ष), डेव्हिड मदन ठाकरे (12 वर्ष) या मुलांना मारहाण करण्यात आली आहे. 

(नक्की वाचा - सचिन वाझेचे सनसनाटी आरोप! पत्रातील 'मोठे पवार' साहेब, 'पाटील' साहेब कोण?)

'तुम्ही माझे कबुतर चोरले' असा आरोप करत चारही मुलांना या तरुणांना मारहाण केली. व्हिडीओत दिसत त्यानुसार, तरुणांने मुलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, उचलून आपटलं, काठीने मारहाण केली. मुलं रडत होती, किंचाळत होते मात्र कोणतीही दया या तरुणांने त्यांच्यावर दाखवली नाही. 

(नक्की वाचा - मित्राची हत्या करुन मृतदेह बॅगेत भरला आणि दादर स्थानकात पोहोचले; तुतारी एक्स्प्रेस पकडणार तोच...)

व्हिडीओ समोर आल्यानंतर मारहाण करणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आयुष स्वर्णकार या युवकाच्या वडिलांचे रक्त तपासणी लॅब असून सदर युवक हा देसाईगंज येथील कस्तुरबा वॉर्ड येथे राहत असल्याची माहिती मिळली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Viral Video, Gadchiroli News, Beaten, व्हायरल व्हिडिओ