जाहिरात

Digital Arrest : खोटं न्यायालय केलं उभं, दोन महिने माग; 20 वर्षांच्या मुलांकडून 86 वर्षांच्या वृद्धेची 20 कोटींची फसवणूक

मुंबईतून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. सायबर गुन्हेगारांनी एका 86 वर्षांच्या महिलेची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात फसवणूक केली आहे.

Digital Arrest : खोटं न्यायालय केलं उभं, दोन महिने माग; 20 वर्षांच्या मुलांकडून 86 वर्षांच्या वृद्धेची 20 कोटींची फसवणूक

Mumbai Digital Arrest : मुंबईतून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. सायबर गुन्हेगारांनी एका 86 वर्षांच्या महिलेची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात फसवणूक केली आहे. त्यांनी महिलेला अटक करण्याची धमकी दिली आणि तिच्याकडून 20 कोटी उकळले. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारांनी महिलेला घाबरवण्यासाठी ऑनलाइन खोट्या न्यायालयाचं कामकाज दाखवलं. हे गुन्हेगार दर तीन तासाला महिलेला फोन करीत होते. ते सतत तिला तिचं लोकेशन विचारत आणि घरातच राहण्याचा आदेश देत होते. तब्बल दोन महिन्यांपर्यंत हा प्रकार सुरू होता. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात आधी महिलेला सीबीआयकडून संदीप राव नावाच्या एका व्यक्तीकडून फोन आला. महिलेच्या नावावर एक बँक खातं उघडण्यात आलं आहे आणि या खात्याचा उपयोग मनी लॉन्ड्रिंगसाठी केला जात असल्याचं त्याने सांगितलं. या खाच्यातून जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या खात्यात पैसे पाठवण्यात आल्याचं त्याने महिलेला सांगितलं. व्हॉट्सअॅप कॉलदरम्यान त्याने महिलेला तिच्या मुलांना अटक करण्याची आणि बँक खाते सील करण्याची धमकी दिली. जर तिने सहकार्य केलं नाही तर तिच्या घरी पोलीस येतील, असंही त्यांनी महिलेला सांगितलं. यानंतर महिला घाबरली. 

Vasai News : गॅस हुंगून तरुणाची आत्महत्या, दारावर धोक्याच्या सूचना; वसईतील हादरवणारा प्रकार

नक्की वाचा - Vasai News : गॅस हुंगून तरुणाची आत्महत्या, दारावर धोक्याच्या सूचना; वसईतील हादरवणारा प्रकार

पैसे ट्रान्सफर कसे केले?
वृद्ध महिलेला सांगण्यात आलं की, डिजिटल इंडिया मुव्हमेंटअंतर्गत तिला पोलीस ठाण्यात येण्याची गरज नाही. पोलिसांच्या निरीक्षणाखाली तिची ई-तपासणी सुरू राहील. 

गुन्हेगारी कृत्यांशी संबंधित निधीची पडताळणी करण्याच्या बहाण्याने महिलेला बँकेचा तपशील देण्यास सांगण्यात आले. त्यांनी त्याला त्याचे सर्व पैसे दिलेल्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले. चौकशीनंतर पैसे परत केले जातील, असंही आश्वासन दिलं. वृद्धेच्या घरात काम करणाऱ्या महिलेला तिच्या वागण्यात बदल जाणवला. त्यामुळे महिलेला वृद्धेच्या मुलीला याबाबत माहिती दिली. 

दोघांना अटक...
एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ती आपल्या खोलीतच राहत होती. कोणाला तरी ओरडत असायची आणि जेवणासाठी बाहेर यायची. बनावट नावाने फोन करणाऱ्या संदीप रावने महिलेला सांगितलं की, एक विशेष टीम या प्रकरणात तपास करीत आहे. तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी ४ मार्चला  एफआयआर दाखल केली. 

हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मालाडमधून शयान शेख (20) आणि मीरा रोडमधून राजिक बट (20) ला अटक केलं आहे. पाच लाख रुपये शेखच्या बँक खात्यात तर नऊ लाख दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते. बटने उरलेले पैसे अन्य आरोपीला ट्रान्सफर केले आणि हे पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये बदलून घेतले.  


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: