जाहिरात

Dawood Ibrahim: दाऊदची संपत्ती लिलावात खरेदी करण्याऱ्यांचे पुढे काय झाले? धक्कादायक गोष्टी आल्या समोर

दाऊदची आणखी एक संपत्ती 2016 मध्ये लिलावात काढण्यात आली होती. पाकमोडिया स्ट्रीटवर असलेल्या या संपत्तीसाठी पत्रकार एस. बालकृष्णन यांनी बोली लावली होती.

Dawood Ibrahim: दाऊदची संपत्ती लिलावात खरेदी करण्याऱ्यांचे पुढे काय झाले? धक्कादायक गोष्टी आल्या समोर
मुंबई:

Dawood Ibrahim Threat: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमला अजूनही पकडण्यात यश आले नाही. गेल्या चार दशकापासून त्याला पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी आजही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. त्यातूनच 2000 साली त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या संपत्तीचा लिलाव केला गेला. डिसेंबर 2000 मध्ये पहिल्या लिलावाची घोषणा करण्यात आली. मात्र दाऊदच्या भितीने कोणीही लिलावात सहभागी झालं नव्हतं. त्यामुळे दाऊद जरी पाकिस्तानात असला तरी त्याची दहशत आजही मुंबईत आहे असं त्यावेळी बोललं गेलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा एकदा लिलावाची घोषणा करण्यात आली. त्यात दिल्लीतील शिवसैनिक आणि वकील अजय श्रीवास्तव यांनी बोली लावली. त्यांना मुंबईतल्या नागपाडा इथं असलेली दाऊदची दोन दुकान लिलावात विकत घेतली. दाऊद सारख्या लोकांना घाबरण्याची गरज नाही हे दाखवून देण्यासाठी ही दुकानं खरेदी केल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितलं. मात्र जरी त्यांनी लिलावात ही दोन्ही दुकानं खरेदी केली असली तरी 25 वर्षानंतरही त्यांना त्या दुकानांचा कब्जा मिळालेला नाही. ही दुकानं आजही दाऊदची बहीण हसीना पारकर हीच्या ताब्यात आहेत. हसीनाने या दुकांनांचा ताबा सोडण्यास नकार दिला होता. 

ट्रेंडिंग बातमी - India Alliance: इंडिया आघाडीत खरोखर फूट पडली आहे का? पडद्यामागे काय घडतंय?

श्रीवास्तव यांच्या प्रमाणेच दिल्लीतील व्यापारी जैन बंधुनीही दाऊची मालमत्ता खरेदी केली होती. 2001 साली पीयुष जैन आणि हेमंत जैन यांनी ताडदेव भागात असलेले 114 चौरस फुटाचे एक दुकान लिलावात खेरदी केले होते. मात्र ज्यावेळी या दुकानाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी ते गेले त्यावेळी त्यांना नकार देण्यात आला. ही संपत्ती केंद्र सरकारच्या अधिपत्या खाली आहे. त्यामुळे कोणत्याही खाजगी व्यक्तीच्या नावावर ही जागा होवू शकत नाही असं त्यांना सांगण्यात आलं. या प्रकरणी त्यांनी सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिझवल्या. 

ट्रेंडिंग बातमी - Delhi Election: मोदींच्या मंत्र्याची दिल्ली विधानसभा निवडणुकीत वेगळी चुल, 15 उमेदवार उतरवले रिंगणात

त्यानंतर तब्बल 23 वर्षानंतर रजिस्ट्रेशनचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. यावेळी रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी आणि दंड ही आकारण्यात आला. ती रक्कम 1 लाख 54 हजार मागितली गेली. मात्र त्यांनी ते दुकान  2 लाख रूपयात विकत घेतले होते. त्यानंतर जैन बंधूनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले. पण त्यांना तिथेही फक्त तारीख पे तारीख मिळाली. शेवटी नाईलाजाने त्यांनी ती रक्कम ही भरली. शेवटी 2024 डिसेंबरमध्ये  ते दुकान त्यांच्या नावावर झाले. पण सर्व काही इथेस संपलं नाही. दुकान नावावर जरी झालं असलं तरी त्याचा ताबा त्यांना अजूनही मिळालेला नाही. 

ट्रेंडिंग बातमी - Ajit pawar: अजित पवार समोर येताच सुप्रिया सुळेंनी हात जोडले, 'त्या' कार्यक्रमात पुढे काय झालं?

दाऊदची आणखी एक संपत्ती 2016 मध्ये लिलावात काढण्यात आली होती. पाकमोडिया स्ट्रीटवर असलेल्या या संपत्तीसाठी पत्रकार एस. बालकृष्णन यांनी बोली लावली होती. पण त्यांना त्यावेळी छोटा शकीलने धमकी दिसी होती. शिवाय त्यांच्यावर हल्ला करण्याचा कटही रचला होता. मात्र पोलिसांनी तो उधळून लावला होता. दाऊदची संपत्ती खरेदी करणं हे जीव धोक्यात घालण्या सारखं होतं. सरकार अशा संपत्तीची निलामी करते. पण त्यानंतर जे लोक ही संपत्ती घेतात त्यांना मात्र वाऱ्यावर सोडलं जातं. पीयुष जैन सांगतात अशा केसमध्ये जोपर्यंत ताबा मिळत नाही तोपर्यंत सरकारने त्यांच्या पाठिशी राहीलं पाहीजे अशी मागणी केली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com