
पोलीसांच्या कचाट्यातून आरोपी कधी सुटत नाही, आणि जरी सुटला तरी तो उशिराने का होईना पुन्हा त्यांच्या जाळ्यात सापडतोच. अशीच एक घटना दिल्ली पोलीसांबाबत झाली आहे. तीन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला दिल्ली पोलीसांनी अतिशय चपळाईने पकडले आहे. विशेष म्हणजे मिठाई वाटण्याच्या बहाण्याने पोलीसांनी या आरोपीला बरोबर हेरलं. त्यानंतर तब्बल तीन वर्षानंतर या आरोपीची रवानगी कारागृहात करण्यात आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्ली पोलीसांच्या गुन्हे शाखेने तीन वर्ष फरार असलेल्या एका आरोपीला पकडले आहे. कैलाश हा चाळीस वर्षाचा आरोपी आहे. त्याने 2008 मध्ये दिल्लीच्या नजफगडमध्ये आपल्या पत्नीची हत्या केली होती. पत्नीचे अनैतिक संबध असल्याचा त्याला संशय होता. त्यातून त्याने ही हत्या केली होती. या हत्ये प्रकरणी त्याला अटक झाली होती. शिवाय 2011 मध्ये त्याला कोर्टाने दोषी ठरवले होते. शिवाय जन्मठेपेची शिक्षा ही सुनावली होती.
कोरोना काळात त्याला तीन महिन्यासाठी पॅरोल मंजूर करण्यात आला होता. पॅरोलचा कार्यकाळ संपल्यानंतर कैलाशने आत्मसमर्पण केले नाही. तो 2021 पासून फरार होता. त्याला पोलीस शोधत होते पण त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता असं अतिरिक्त पोलीस आयुक्त संजयकुमार सैन यांनी सांगितलं. पोलीस आपल्याला पकडणार हे त्याला माहित होते. त्यामुळे त्यांच्यापासून वाचण्यासाठी तो नेहमी जागा बदलत होता.
ट्रेंडिंग बातमी - Bollywood News: 1 करोड फी घेणारी बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री कोण?
सुटकेनंतर एक वर्ष तो दिल्लीतील लक्ष्मीनगरमध्ये राहात होता. त्यानंतर तो हरिद्वारमध्ये गेला. तिथे तो दोन वर्ष राहीला. त्यानंतर त्याने आपल्या मुळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तो मध्य प्रदेशातल्या मुळ गावी परत आला. तिथे तो मजूराचं काम करत होता. याची माहिती दिल्ली पोलीसांना मिळाली. त्यांनी आपल्या खबरींकडून याबाबत खातरजमा करून घेतली. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पोलीस साध्या वेशात शिवपूरी या गावात गेले. कुणाला शंका येवू नये म्हणून त्यांनी तिथे मिठाईचे वाटपही केले. त्याच वेळी त्याची ओळख पटवली. नंतर त्याला तिथेच अटक करण्यात आली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world