जाहिरात

व्हॉट्सअ‍ॅप कॉल अन् क्रिप्टोचा खेळ; लंडनमधून मास्टर्सची डिग्री घेतलेल्या तरुणाचं पैशांसाठी भयंकर कृत्य

एका मोठा टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सायबर फसवणूक करून ही टोळी लोकांकडून पैसे उकळत होती.

व्हॉट्सअ‍ॅप कॉल अन् क्रिप्टोचा खेळ; लंडनमधून मास्टर्सची डिग्री घेतलेल्या तरुणाचं पैशांसाठी भयंकर कृत्य
  • दिल्ली पुलिस ने एक अंतरराष्ट्रीय साइबर ठगी और जबरन वसूली करने वाले गिरोह का भंडाफोड़ किया है.
  • आरोपियों ने थाईलैंड से व्हाट्सएप कॉल कर पैसे मांगे थे और ना देने पर जान से मारने की धमकी दी थी.
  • गिरोह के सदस्यों में से एक लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स से मास्टर डिग्री धारक भी शामिल है.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी दिल्ली:

Cyber Fraud : दिल्ली पोलिसांनी एका मोठा टोळीचा पर्दाफाश केला आहे. सायबर फसवणूक करून ही टोळी लोकांकडून पैसे उकळत होती. आश्चर्यकारक बाब म्हणजे या टोळीतील एका सदस्याने लंडनमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींनी अलीकडेच थायलंडमधून फोन करून लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न केला. पोलीस सध्या आरोपींची चौकशी करत आहेत आणि टोळीतील इतर सदस्यांनाही अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, तीन जणांनी थायलँडमधून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एका व्यावसायिकाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी त्याला क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे ट्रान्सफर करण्याची मागणी केली आणि नकार दिल्यास त्याच्या मुलांना मारण्याची धमकी दिली. हे आरोपी दिल्लीत राहणारे असून सुमित (42), प्रिन्स (35) आणि नितीश (31) अशी त्यांची नावं आहेत. आश्चर्यकारक बाब म्हणजे नितीशने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मधून मास्टर्सची पदवी घेतली आहे. तर सुमीतने बी.कॉमपर्यंतचे शिक्षण घेतले तर पिन्स नववीपर्यंत शिकला.

Whale Ambergris : दापोलीत 5.45 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, वाचा काय आहे प्रकरण?

नक्की वाचा - Whale Ambergris : दापोलीत 5.45 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, वाचा काय आहे प्रकरण?

व्यावयासिकाला या तिघांकडून धमकी मिळाल्यानंतर डीबीजी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर तपास पथकाने आरोपीवर लक्ष ठेवण्यास सरुवात केली. पीडित व्यक्तीच्या तक्रारीनुसार, त्याला व्हॉट्सअॅपवर एक आंतरराष्ट्रीय कॉल आला होता आणि कॉलरने स्वतःची ओळख एक कुख्यात गुंड म्हणून करून दिली.  कॉलरने क्रिप्टो क्यूआर कोड पाठवला आणि पैसे जमा करण्यास सांगितले. जर ऐकलं नाही तर तुझ्या मुलाला गोळ्या घालून ठार करू अशी धमकी व्यावसायिकाने पीडित चरुणाला दिली होती. 

चौकशीदरम्यान आरोपींचा मोठा खुलासा...

चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितलं की, त्यांच्यावर मोठं कर्ज झालं आहे. कर्ज फेडण्यासाठी त्याने सोपा आणि तातडीने पैसे देणाऱ्या मार्गाचा अवलंब केला. सुमीत पीडित व्यक्तीला ओळखत होता. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली. त्याला घाबरवण्यासाठी त्यांनी गँगस्टरच्या नावाचा वापर केला. यासाठी ते थायलँडला गेले. येथे त्यांनी आंतरराष्ट्रीय सिम कार्ड घेतलं. आणि वसुलीसाठी व्हॉट्सअॅप कॉल केला. मध्य दिल्लीचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) निधान वलसन म्हणाले की, कर्ज आणि लोभ एखाद्या व्यक्तीला चुकीच्या मार्गावर नेऊ शकतात हे या प्रकरणातून दिसून येते. आरोपी कितीही हुशार असल्याचे भासवत असला तरी, दिल्ली पोलिसांची सायबर टीम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com