Vasai News : वसईच्या पेल्हार येथे मुंबई पोलिसांच्या झोन सहामधील अँटीनार्कॉटिक्स सेल आणि टिळक नगर पोलिसांनी मिळून केलेल्या धडक कारवाईत एका ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. पेल्हार येथील रशीद कंपाउंडमध्ये राजरोसपणे MD ड्रग्स बनवण्याचा कारखाना सुरू होता. विशेष म्हणजे याचा मास्टर माईंड दुबईतून MD ड्रग्स फॅक्टरी (MD Drugs Factory) ऑपरेट करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून या प्रकरणात आणखी कुणाकुणाचा हात आहे का ? याचा तपास केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी टिळकनगर पोलीस ठाण्यात एक ड्रग्स संदर्भात गु्न्हा दाखल करण्यात आला होता. त्याची पाळंमुळं शोधत असताना या कारखान्याबाबत माहिती मिळाली. सात किलोपेक्षा जास्त ड्रग्सचा साठा सापडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेक्षात याची किंमत जवळपास १४ कोटींची असल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा - Shocking: समलैंगिक मित्राच्या मुलीबरोबरच्या कृत्याने बापाचा संताप अनावर; क्रूर सूड घेतला, पण अखेर स्वतः...
या कारखान्यापासून जवळच पोलीस स्टेशन आहे. अशाही परिस्थितीत येथे ड्रग्स फॅक्टरी सुरू होती. काही दिवसांपूर्वी जवळच असलेल्या कामन या गावात ड्रग्सची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली होती. त्यानंतर आता पेल्हार येथील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स निर्मितीचा कारखाना सुरू होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
