नागिंद मोरे, प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील होळ गावाजवळ 14 सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिंदखेडा तालुक्यातील काहीजणं नरडाणा येथे भागवत कथा ऐकण्यासाठी गेले होते. भागवत कथा संपल्यानंतर आपल्या घरी परतत असताना रात्रीच्या वेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या इको गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीचा चक्काचूर झाला.
या अपघातात चार चाकी वाहनांमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार पिकअप वाहनाचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्यातूनही हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा - 10 वर्षांनी पाळणा हलला, बारसं करून पुण्याला जाताना कुटुंब संपलं; ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे 4 हकनाक बळी!
दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या अपघातात सहा महिन्यांचं बाळ, त्याची आई, आजी आणि एक लहान मुलगी अशा चार जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपी चालक मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी डिव्हायडर पार करीत पुण्याला जाणाऱ्या कारला धडक दिली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world