जाहिरात

Fraud News: नाशिकच्या महिलेची फसवणूक! कानपूरच्या बाबाला जन्माची अद्दल घडली; ग्राहक न्यायालयाकडून दणका

पूजेनंतर कोणताही परिणाम न झाल्याने महिलेने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने फसवणूक झालेल्या रक्कमेसह मानसिक त्रासापोटी पैसे देण्याचे आदेश दिले आहेत.

Fraud News:  नाशिकच्या महिलेची फसवणूक! कानपूरच्या बाबाला जन्माची अद्दल घडली; ग्राहक न्यायालयाकडून दणका

नाशिक: भुतबाधेची समस्या सोडवण्याचा बहाणा करत 2 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या कानपूरमधील भोंदूबाबाला  नाशिकच्या महिलेने चांगलाच धडा शिकवला आहे. पूजेनंतर कोणताही परिणाम न झाल्याने महिलेने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने फसवणूक झालेल्या रक्कमेसह मानसिक त्रासापोटी पैसे देण्याचे आदेश दिले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी नाशिकमधील एका महिलेने कानपुरमधील लवकुश आश्रमाचे संतोष अजिंग भदोरिया याच्याकडे धाव घेतली होती. या बाबाने भूतबाधा दूर करुन देतो असे म्हणत पीडित महिलेकडून  दोन लाख 51 हजार रुपये घेतले आणि ऑनलाईन पूजा केली.

मात्र पूजेनंतर कोणताही परिणाम न झाल्याने महिलेने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर  संतोष अजिंग भदोरिया नावाच्या भोंदू बाबाला नाशिकच्या ग्राहक न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. न्यायालयाने फसवणूक झालेल्या रक्कमेसह मानसिक त्रासापोटी पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ग्राहक न्यायालयाच्याया  निर्णयाचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून स्वागत करण्यात आले आहे. 

नक्की वाचा - Sharad Pawar: एकनाथ शिंदेंचे कौतूक करताना शरद पवारांची गुगली, मात्र दिल्लीतलं वातावरण तापलं

कोण संतोषसिंग भदोरिया बाबा ? 

उत्तर प्रदेशातील हा विवादास्पद गुन्हेगार प्रवृत्तीचा तथाकथित महाराज आहे. कानपुर जवळ असलेल्या करौली या गावात या महाराजाचा आश्रम आहे. १४ एकरात हा अनधिकृत आश्रम स्थित आहे.  तथाकथित तंत्रमंत्र ,जादुटोणा करण्यासाठी हा भोंदुबाबा कुप्रसिद्ध आहे. अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहे.

शेतकरी नेता अशी ख्याती मिळाल्याने त्याने अनेक जमिनी हडप करुन नावावर केल्या. करौली येथील हा असाच जमिन बळकावून आश्रम तयार केला आहे. कॅन्सर सारखे आजार बरे करण्याचा दावा तो करतोय. विरोध करणाऱ्यांना तो हाणामारी करतो. यु ट्युब वर तो प्रसिध्द आहे. त्यांचे विवादास्पद चित्रफीत युट्युबवर उपलब्ध आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: