जाहिरात

गँगस्टरसोबत पळून गेली होती IAS ऑफिसरची पत्नी, नवऱ्याच्या घरी परतली आणि....

IAS officer estranged wife who eloped with gangster : वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याची पत्नी गँगस्टरसोबत पळून गेल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

गँगस्टरसोबत पळून गेली होती IAS ऑफिसरची पत्नी, नवऱ्याच्या घरी परतली आणि....
IAS अधिकाऱ्याची पत्नी गँगस्टरसोबत पळून गेली होती. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

एका धक्कादायक बातमीनं गुजरात हादरलंय. गुजरातमधील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याची पत्नी गँगस्टरसोबत पळून गेल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या महिलेनं रविवारी नवऱ्याच्या घरासमोर विषप्राशन केलं. त्यानंतर तिला तातडीनं सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

'टाईम्स ऑफ इंडिया' च्या बातमीनुसार वरिष्ठ आयएएस अधिकारी रंजीत कुमार जे. यांची पत्नी सूर्या जे (वय 45) काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूमधील गँगस्टरसोबत पळून गेली होती. तामिळनाडू हे या दाम्पत्याचं गृहराज्य आहे. रंजीत कुमार सध्या गुजरात विद्यूत नियामक विभाग (GEC) चे  सचिव आहेत. सूर्या शनिवारी  त्यांच्या गांधीनगरमधील सेक्टर 19 मधील घरी परतल्या. सूर्यावर एका मुलाच्या अपहरणात सहभागी असल्याचाही आरोप होता. सूर्याला घरात घेण्यास रंजीत कुमार यांनी मज्जाव केला. त्यानंतर तिनं दारातच विषप्राशन केलं. 

पोलिस अधिकाऱ्यानं वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, 'कुमार सूर्यासोबतच्या घटस्फोटाला अंतिम रुप देण्यासाठी शनिवारी घराच्या बाहेर होते. त्यावेळी घरात प्रवेश करण्यास मज्जाव केल्यानं सूर्यानं विष प्राशन केलं आणि 108 क्रमांकाला (रुग्णवाहिका हेल्पलाईन) फोन केला. पोलिसांना एक तामिळमधील आत्महत्या नोट देखील मिळाली आहे. सूर्यावर मदुराईमधील 14 वर्षांच्या मुलाच्या अपहरणात सहभागी असल्याचा आरोप आहे. याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

( नक्की वाचा : डोंबिवलीतील महिलेला मित्रासोबतची मस्ती नडली, तो वाचला ती मात्र...)

या प्रकरणात सूर्याचं नाव तिचा कथित प्रेमी आणि 'हायकोर्ट महाराजा' नावानं प्रसिद्ध असलेल्या सेंथिल कुमार या गँगस्टरसोबत पळून गेल्यानं चर्चेत आलं होतं. त्यांनी मुलाच्या आईशी असलेल्या वादातून मदुराईतून 11 जुलै रोजी हे अपहरण केलं होतं. मुलाच्या सुटकेसाठी त्यांनी 2 कोटींची खंडणी मागितली होती. पण, मदुराई पोलिसांना मुलाची सुटका करण्यात यश आलं. त्यानंतर सूर्या आणि तिच्या साथिदारांचा शोध सुरु होता. 

सूर्या जवळपास 9 महिन्यांपूर्वी तिचा प्रियकर 'हायकोर्ट महाराजा' सोबत पळून गेली होती. मुलाच्या अपहरणात नाव आल्यानं ती नवऱ्याच्या घरी परतली होती. त्यावेळी तिला घरात घेऊ नये असे निर्देश कुमार यांनी दिले. त्यामुळे नाराज होऊन तिनं हे टोकाचं पाऊल उचललं, अशी माहिती या प्रकरणाशी संबंधित एकानं वृत्तपत्राला दिली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com