पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ते दोघे ही विवाहीत होते. त्याला दोन मुलं तर तिला एक मुलगा. ती नवऱ्याला सोडून तर हा बायकोला सोडून एकमेकाबरोबर लिव्हइनमध्ये राहत होते.सुरुवातीचे दिवस चांगले गेल. जवळपास पाच वर्ष ते लिव्हइन मध्ये राहीले. पण नंतर खटके उडण्यास सुरूवात झाली. भांडणं टोकाली गेली. त्याचा परिणाम तिला भोगावा लागला. इतकच काय तर तिच्या मुलावरही त्याचा वाईट परिणाम झाला. या नात्याचा भयंकर अंत झाला. या घटनेनं संपुर्ण परिसर हादरून गेला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात दिनेश ठोंबरे आणि जयश्री मोरे हे लिव्हइन मध्ये राहात होते. दिनेशचे आधी लग्न झाले होते. त्याला दोन मुले ही आहेत. तर जयश्री ही नवऱ्यापासून वेगळी राहाते. तिलाही एक मुलगा आहे. हे दोघेही गेल्या पाच वर्षापासून लिव्हइन मध्ये राहात आहेत. गेल्या काही दिवसापासून दिनेश आणि जयश्रीमध्ये वाद होत होते. जयश्री दिनेशकडे पैशाची मागणी करत होती. शिवाय पहिल्या पत्नीला सोडण्याचा आग्रह करत होती. यावरून दोघांमध्ये खटके उडत होते. रोज भांडणही याच मुद्द्यावरून होत होती.
ट्रेंडिंग बातमी - शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला, मोदी- शाहांचा निर्णय मान्य करणार
24 नोव्हेंबरला ही दिनेश घरी आला. त्यावेळी जयश्रीने पुन्हा तोच विषय त्याच्या समोर छेडला. वाद इतका वाढला की दिनेशने हातोड्याने जयश्रीच्या डोक्यावर घाव घातला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दिनेशने मोठ्या शिताफीने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. साताऱ्यातील खंबाटी घाटात तिचा मृतदेह टाकून दिला. काहीच घडले अशा पद्धतीने तो पुन्हा वाकडमध्ये दाखल झाला. त्यानंतर जयश्रीच्या 3 वर्षाच्या मुलालाही त्याने आळंदी इथे त्याने सोडून दिले.
ट्रेंडिंग बातमी - 'एकनाथ शिंदे इतके दिवस गप्प का होते?' काँग्रेसचा एक सवाल अन् अनेक शंका
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने थेट वाकड पोलिस स्टेशन गाठलं. आपली पत्नी जयश्री बेपत्ता असल्याची तक्रार दिली. ती हरवल्याचा बनाव केला. त्याने जयश्रीचे वर्णन पोलिसांना सांगितले. त्या वर्णना प्रमाणेच एक मृतदेह पोलिसांना मिळाला होता. तो मृतदेह जयश्रीचाच होता. याबाबत मग पोलिसांनी तपास सुरू केला. दिनेशच तिचा हत्यारा आहे हे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. पोलिसांनी त्याला पकडले. त्याची चौकशी केली. त्यात त्याने आपल्या गुह्याची कबुली ही दिली. त्याच बरोबर जयश्रीच्या मुलाला बेवारस सोडल्याचंही सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world