जाहिरात

Pune News : कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील बरणीत मृत अर्भक? पुणे जिल्ह्यातील घटनेने खळबळ

कचऱ्यामध्ये एका बरणीत अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Pune News : कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील बरणीत मृत अर्भक? पुणे जिल्ह्यातील घटनेने खळबळ

देवा राखुंडे, प्रतिनिधी

Crime News : दौंड शहरालगत असणाऱ्या बोरावके नगरमध्ये  प्राईम टाऊनच्या पाठीमागे कचऱ्याच्या ढिगार्‍यात मृत अर्भक आणि मानवी शरीराचे काही अवशेष आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या वृत्तानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी हे मृत अर्भक आणि मानवी शरीराचे अवशेष हे प्रयोगशाळेतील नमुने असल्याची माहिती मिळत असली तरी हा गर्भपाताचा प्रकार आहे का या दृष्टीने देखील पोलीस तपास करीत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या 112 क्रमांकाला फोन करून या संदर्भातील माहिती दिली. यानंतर या ठिकाणी दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी अंती पंचनामा करून डॉक्टरांचे वैद्यकीय पथक या ठिकाणी बोलावले. हे अर्भक आणि अवशेष ताब्यात घेण्यात आले असून हे या ठिकाणी कसे आले याचा शोध आता घेतला जात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या अहवालानुसार यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

Crime News: सावत्र पित्याकडून अत्याचार, पीडित मुलीने गुप्तांगावरच केला वार

नक्की वाचा - Crime News: सावत्र पित्याकडून अत्याचार, पीडित मुलीने गुप्तांगावरच केला वार

मिळालेल्या माहितीनुसार, हे अर्भक आणि काही मानवी शरीराचे अवशेष सीलबंद बरणीत असून त्या संदर्भातील माहिती देखील समोर आली आहे. हे अर्भक 2020 मधील असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे. मात्र हे कचऱ्याच्या ढिकाऱ्यात कसे आले याचा शोध घेतला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: