जाहिरात

Jalgaon Crime: क्रूरतेचा कळस! विकृताने कुत्र्याला गाडीला बांधले, निर्दयीपणे फरफटत नेले

सलीम अन्सारी असे विकृत तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर आली असून सदर तरुण हा जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

Jalgaon Crime: क्रूरतेचा कळस! विकृताने कुत्र्याला गाडीला बांधले, निर्दयीपणे फरफटत नेले

मंगेश जोशी, जळगाव:  जळगावमध्ये एका विकृत तरुणाने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेल्याची संतापजनक घटना घडली आहे. कुत्र्याचा केलेला अमानुष छळ पाहून काही प्राणीप्रेमींनी त्याला हटकले, धक्कादायक म्हणजे या विकृताने त्यांच्यावरही अरेरावी केल्याचे समोर आले आहे. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून प्राणीप्रेमी आक्रमक झाले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जळगाव शहरात एका विकृत आकडून कुत्र्याचा अमानुष छळ केल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला असून एका विकृत तरुणाने चक्क मोटरसायकलला कुत्र्याचे पाय बांधून कुत्र्याला फरफटत नेत कुत्र्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. सदर प्रकार हा काही प्राणी प्रेमींच्या लक्षात येतात प्राणी प्रेमींनी या तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र या विकृत तरुणांकडून प्राणी प्रेमींनाही दमदाटी व धमकवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र प्राणी प्रेमींनी जमलेल्या नागरिकांनी विक्रोताच्या तावडीतून कुत्र्याची सुटका केली असून अनेक किलोमीटर पर्यंत मोटरसायकलला बांधून कुत्र्याला फरफटत नेल्या मुळे कुत्रा हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत प्राणी प्रेमींनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून जखमी कुत्र्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू आहेत. या अमानुष घटनेची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे.

नक्की वाचा - Pune Swargate Crime : पुण्यातील बड्या नेत्याचा कार्यकर्ता? पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीचं भयंकर रुप समोर

दरम्यान,  सदर विकृत तरुणा विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहे. सलीम अन्सारी असे विकृत तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर आली असून सदर तरुण हा जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: