जाहिरात

Kalyan : हत्येच्या गुन्ह्यात निष्पाप तरुणाला तुरुंगवास, कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Kalyan Murder Case : एखाद्या प्रकरणात कुणी दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण, कल्याणमध्ये भलताच प्रकार घडला.

Kalyan : हत्येच्या गुन्ह्यात निष्पाप तरुणाला तुरुंगवास, कल्याणमधील धक्कादायक प्रकार
कल्याण:

अमजद खान, प्रतिनिधी

Kalyan Murder Case : एखाद्या प्रकरणात कुणी दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण, कल्याणमध्ये भलताच प्रकार घडला. एका तरुणाला हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आली. तो 15 दिवस जेलमध्ये होता. पण, नंतर ही हत्या भलत्याच व्यक्तीनं केल्याचं समोर आलं. खरा मारेकरी सापडल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला जेलमधून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र या प्रकरणात त्याची जी बदनामी झाली, त्याला जेलमध्ये जावे लागले, त्याची परतफेड कशी होणार? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

कल्याणच्या आटाळी परिसरात रंजना पाटेकर या 60 वर्षांच्या महिलेची हत्या करण्यात आली. ही हत्या लुटीच्या उद्देशानं झाली होती. आरोपीनं महिलेच्या अंगावरील दागिने लुटले होते. त्यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली.

मृत महिलेच्या नातेवाईकांनी शेजारी राहणाऱ्या दिपेश सपकाळे या तरुणावर संशय व्यक्त केला. काही दिवसापूर्वी त्याच्यासोबत आमचे भांडण झाल होते. त्याने ही हत्या केली असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी संशयाच्या आधारावर दिपेशला अटक केली. त्याला सुरुवातीला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली सध्या तो जेलमध्ये आहे. 

( नक्की वाचा : पत्नीच्या हत्येसंबंधी पतीला जेल पण जबरदस्त ट्विस्ट, 4 वर्षांनी बायको बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये सापडली )

कसा झाला खुलासा?

दीपेशला अटक केल्यावर त्याच्याकडून चोरलेले दागिने हस्तगत केले नव्हते. कारण दीपेश याने चोरीच केली नव्हती. त्याने हत्याही केली नव्हती याचा खुलासा आत्ता होत आहे. या प्रकरणात चांद शेख या आरोपीला अटक केली आहे. चांद एका हत्येच्या गुन्हयात 9 वर्षे जेलमध्ये होता. आत्ता जेलमधून सुटल्यावर त्याने लूटीच्या उद्देशाने पुन्हा हत्या केली आहे. त्या संध्याकाळी वयोवृद्ध महिला घरी असताना आरोपीच्या घरासमोर आला त्याने पिण्यासाठी पाणी मागितले .महिला घराच्या आत पाणी घेण्यासाठी गेली चांद यांनी टीव्हीचा आवाज जोरात केला आणि लुटीचे प्रकार सुरू केलं यादरम्यान वयोवृद्ध महिलेने प्रतिकार केल्याने त्याची हत्या करून चांद दागिने घेऊन पसार झाला.

पोलिसांनी चांदला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेले 1 लाख 5 हजार रुपयांचे दागिनेही हस्तगत केले आहे. आत्ता या प्रकरणात आधी अटक झालेल्या दीपेश सपकाळे याला जेलमधून बाहेर काढण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे. मात्र 15 दिवसापासून जेलमध्ये असलेल्या एका खोट्यात गुन्ह्यात अडकलेल्या जेलमधून सुटका होईल. मात्र त्याच्या जीवनावर काय परिणाम होणार ? त्याची जी बदनामी झाली त्याची परतफेड कशी होणार ? असा  उपस्थित केला जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: