जाहिरात

Kalyan News: कल्याणमध्ये लुडोच्या खेळाचा थरारक शेवट; मामानेच संपवला भाच्याचा खेळ, कारण ऐकून बसेल धक्का!

Kalyan News: कल्याणमध्ये मोबाईलवर लुडो खेळताना झालेल्या एका शुल्लक वादाचे रूपांतर रक्तरंजित हत्येत झाले आहे.

Kalyan News: कल्याणमध्ये लुडोच्या खेळाचा थरारक शेवट; मामानेच संपवला भाच्याचा खेळ, कारण ऐकून बसेल धक्का!
Kalyan News : मामा आणि भाचा रात्री वेळ घालवण्यासाठी मोबाईलवर लुडो खेळत बसले होते. (प्रतिकात्मक फोटो)
कल्याण:

Kalyan News: कल्याणमध्ये मोबाईलवर लुडो खेळताना झालेल्या एका शुल्लक वादाचे रूपांतर रक्तरंजित हत्येत झाले आहे. एका अल्पवयीन मामाने त्याच्याच सख्ख्या भाच्याचा गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ पुढील डाव कोणी खेळायचा, या किरकोळ कारणावरून मामाने हे टोकाचे पाऊल उचलले.

काय आहे प्रकरण?

आजकाल मोबाईलवर लुडो खेळणे हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता विरंगुळा झाला आहे. मात्र, कल्याण पश्चिमेतील उंबर्डे कोळीवली परिसरात या खेळाने एका घराचा आनंद हिरावला आहे. दिवसभर काम संपवून घरी परतलेले मामा आणि भाचा रात्री वेळ घालवण्यासाठी मोबाईलवर लुडो खेळत बसले होते. खेळ रंगात आलेला असतानाच पुढील चाल किंवा डाव कोणाचा, यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली.

( नक्की वाचा : Amravati News: 'तरुण दिसता' या एका कौतुकाने शेतकऱ्याचे 70 लाख पाण्यात; अमरावतीत हनी ट्रॅपचा प्रकार )

रागाच्या भरात मामा बनला कंस

हा वाद इतका विकोपाला गेला की, आपला डाव भाच्याने खेळल्यामुळे अल्पवयीन मामा प्रचंड संतापला होता. रात्र झाल्यानंतर जेव्हा सर्वजण गाढ झोपेत होते, तेव्हा या अल्पवयीन मुलाने घरातील भाजी कापण्याची सुरी घेतली आणि झोपेत असलेल्या त्याच्या भाच्याचा गळा चिरला. या हल्ल्यात भाच्याचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Latest and Breaking News on NDTV

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. कल्याणचे एसीपी अशोक होनमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मामा हा अल्पवयीन आहे. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले असून हत्येसाठी वापरलेले शस्त्रही जप्त केले आहे. मोबाईल गेमच्या नादात आणि रागावर नियंत्रण न राहिल्यामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.

( नक्की वाचा : Dombivli News: नवऱ्यानं आधी घरातील सिलेंडर लांबवला, आता पत्नीला सांगतोय ‘धंदा कर'; डोंबिवलीतील संतापजनक प्रकार )
 

मोबाईल गेमिंगचे भयानक वास्तव

ज्या खेळात केवळ सोंगटी मारली जाते, तिथे एका माणसाचा जीव घेतला जाईल अशी कल्पना कोणीही केली नव्हती. लुडोच्या एका डावावरून सुरू झालेला हा वाद एका तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. या घटनेमुळे मोबाईल गेमिंगचे व्यसन आणि त्यातून निर्माण होणारी हिंसक प्रवृत्ती यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com