
अमजद खान, प्रतिनिधी
Knief Attack : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलमधील प्रवाशांमध्ये झालेल्या वादातून चाकू हल्ला झाला आहे. डोंबिवली स्टेशनमध्ये हा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत जिया हुसेन शेख असं या आरोपीचं नाव असून त्याला डोंबिवली जीआरपीने नागरिकांच्या मदतीनं अटक केलीय. बुधवारी सकाळी ही घटना घडली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी कल्याण दादर लोकल कल्याण स्टेशनमध्ये आली. त्यावेळी त्यामध्ये काही प्रवासी चढले. त्यामध्येच जिया हुसेन या मुंब्र्यच्या तरुणाचा समावेश होता. त्याला मुंब्रा स्थानकात उतरायचे होते. इतर प्रवाशांनी सांगितले की, ही लोकल जलद आहे. मुंब्रा स्टेशनमध्ये थांबणार नाही. त्यावेळी या प्रवाशाने डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरण्याचा प्रयत्न केला. डोंबिवली स्थानकात उतरण्यावरुन वाद झाला.
( नक्की वाचा : Dombivli '65 बेकायदा इमारतीमध्ये घोटाळा करणाऱ्याला पोलिसांचे संरक्षण', थेट आयुक्तांसमोरच गंभीर आरोप )
या वादावरुन जिया हुसेन शेख या तरुणाला काही प्रवाशांनी मारहाण केली. त्यानंतर जिया शेख यांनी त्याच्या जवळचा चाकू काढून तीन प्रवाशांवर हल्ला केला. या हल्ल्यात प्रवासी अक्षय वाघ, हेमंत काकरिया आणि राजेश चांगलानी असे आहे. या हाणामारीत जिया शेखला देखील दुखापत झाली आहे. अखेर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी प्रवाशांच्या मदतीनं त्याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world