जाहिरात

दारू, डिजे, बेधुंद तरुण अन् 9 महिला! रंगलेल्या पार्टीत पोलीस घुसले अन् पुढे...

गगनबावडा येथे पोलिसांनी गुरुवारी रात्री एका खासगी रिसॉर्टवर छापेमारी केली. नयनील रिसॉर्ट असं या कारवाई केलेल्या फार्म हाऊसचं नाव आहे.

दारू, डिजे, बेधुंद तरुण अन् 9 महिला! रंगलेल्या पार्टीत पोलीस घुसले अन् पुढे...
कोल्हापूर:

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर एका बेकायदेशीर पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली. या कारवाईत तब्बल साडेचार लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला. गगनबावडा येथे ही कारवाई करण्यात आली. ही बेकायदा पार्टी कोणी आयोजित केली होती? त्या पार्टीला कोण आले होते? याबाबतची माहिती पोलिस घेत आहेत.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गगनबावडा येथे पोलिसांनी गुरुवारी रात्री एका खासगी रिसॉर्टवर छापेमारी केली. नयनील रिसॉर्ट असं या कारवाई केलेल्या फार्म हाऊसचं नाव आहे. बेकायदेशीररित्या रात्रीची पार्टी सुरू होती. याची माहिती मिळताच  संबंधित फार्म हाऊसवर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत 31 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच दारू आणि मोबाईल असा साडेचार लाखांचा मुद्देमाल गगनबावडा पोलिसांनी जप्त केला आहे. गगनबावड्यातील कोदे परिसरात झालेल्या या कारवाईनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  पवार कुटुंबात दुरावा वाढला? ऐन दिवाळीत बारामतीत काय झालं?

पोलिसांनी ही कारवाई केली त्यावेळी त्या पार्टीत 9 महिला ही उपस्थित होत्या. कोदे परिसरात रात्री सुरु असलेल्या या पार्टीचा सुगावा गगनबावडा पोलिसांना लागला. पोलिसांनी ही माहिती मिळताच थेट रिसॉर्टवर धडक दिली. या पार्टीत काहीजण दारूच्या नशेत होते. काही महिला देखील यामध्ये होत्या. त्या देखील नशेत असल्याचे बोलले जात आहे. त्या अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याचे पोलिसांना दिसून आले. गगनबावडा पोलिसांनी या पार्टीत सहभागी असलेल्यांची चौकशी सुरु केली आहे. यावेळी ही पार्टी बेकायदेशीर असल्याचे समोर आलं. यानंतर पोलिसांनी 31 जणांवर गुन्हा दाखल केला. 

ट्रेंडिंग बातमी - शिवसेना विरुद्ध शिवसेना! बाजी कोण मारणार? कदमांचा खळबळजनक दावा

या पार्टीबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी याचा अधिक तपास सुरु केला. ही पार्टी कोल्हापुरात होती. पण यामध्ये मुंबई, पुणे आणि सांगलीसह इतर जिल्ह्यातील तरूण सहभागी झाले होते. दारूच्या नशेत बेधुंद होऊन तरुण आणि तरुणी साऊंड सिस्टिमच्या तालावर थिरकत होते. अनेक लोक कोदे परिसरात पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या पार्टी ग्रामीण भागात होणं ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांमधून येत आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com