जाहिरात

शिवसेना विरुद्ध शिवसेना! बाजी कोण मारणार? कदमांचा खळबळजनक दावा

शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गटात जवळपास 51 ठिकाणी थेट लढत होत आहे. या लढतीत कोण सरस ठरेल याचा अंदाज लावण्यात आला आहे.

शिवसेना विरुद्ध शिवसेना! बाजी कोण मारणार? कदमांचा खळबळजनक दावा
रत्नागिरी:

शिवसेने बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे कोणत्या गटाची किती ताकद आहे हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. त्यात सर्वांचे लक्ष लागले आहे ते शिवसेनेच्या दोन्ही गटांकडे. शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गटात जवळपास 51 ठिकाणी थेट लढत होत आहे. या लढतीत कोण सरस ठरेल याचा अंदाज शिवसेना आमदार योगेश कदम यांनी वर्तवला आहे. योगेश कदम हे शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजिव आहेत. ते दापोली विधानसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना या निवडणुकीचा निकाल काय असेल हेच सांगितले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यात जवळपास 51 जागांवर थेट लढत होत आहे. या दोघांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहेत. खरी शिवसेना कोणाची हे या लढतीवरून स्पष्ट होणार आहे. शिवसेना जरी फुटली असली तरी शिवसैनिक मात्र कोणा बरोबर आहेत हे दाखवून देणारी ही निवडणूक आहे. या थेट लढतीत शिवसेना शिंदे गटाचा फायदा होईल असा दावा योगेश कदम यांनी केला आहे. 51 पैकी 45 ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी होती असेही त्यांनी सांगितले. लोकसभेतही अनेक मतदार संघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा लढती झाल्या होत्या. 

ट्रेंडिंग बातमी - मनसेच्या उमेदवाराची प्रतिस्पर्ध्यासोबत सिक्रेट मिटींग, मनसेच्याच नेत्याने बाहेर काढला फोटो

मात्र त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या मतां मुळे ठाकरेंच्या उमेदवारांना विजय मिळाला होता असे कदम यांनी सांगितले. मात्र विधानसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मतदार हे ठाकरेंना मतदान करणार नाहीत. काँग्रेस राष्ट्रवादीला आता समजले आहे की आपल्या मतांवर शिवसेना ठाकरेंचे लोक निवडून येतात. त्यामुळे ते आता ठाकरेंना मतदार करणार नाहीत असा दावा ही त्यांनी केला.     

ट्रेंडिंग बातमी - प्रकाश आंबेडकरांना हृदयविकाराचा झटका का आला? आज तातडीने होणार शस्त्रक्रिया 

मुंबईतला मराठी माणूस हा बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मतदान करेल. खरा शिवसैनिक हा धुनष्य बाणाचेच बटण दाबेल असेही त्यांनी स्पष्ट केले. 23 तारखेला निकाल लागेल तेव्हा शिंदे गटाच्या थेट लढतीतील 45 जागा निवडून येतील असेही योगेश कदम म्हणाले. शिवाय महाविकास आघाडीचं सरकार येणार नाही. सरकार सोडा महाविकास आघाडीच राहाणार नाही असे ही ते म्हणाले. काँग्रेस आणि शरद पवार मिळून ठाकरेंना संपवतील असे ही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना अस्तित्व हिन झालेली असेल असेही त्यांनी सांगितले.  

ट्रेडिंग बातमी - लोकसभेला ताई, विधानसभेला दादा!अजित पवारांचं ते वक्तव्य पुन्हा चर्चेत का?

दापोली विधानसभा मतदार संघा बाबतही त्यांनी एक वक्तव्य केले आहे. या मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाला संजय कदम यांना उमेदवारी द्यायची नव्हती. त्यामुळेच त्यांना एबी फॉर्म हा उशिरा मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या ऐवजी अनिकेत कदम हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यासाठी आपलेच काका प्रयत्नशिल होते असा गौप्यस्फोटही त्यांनी केली. शिवाय संजय कदम यांना उमेदवारी मिळू नये यासाठी त्यांचेच सहकारी प्रयत्न करत होते असे योगश कदम म्हणाले.दापोली मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे संजय कदम मैदानात आहेत. तर शिंदे सेनेकडून योगेश कदम निवडणूक लढत आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com