सुनील कांबळे, लातूर: शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यामध्ये घडली आहे. काका आणि पुतण्यामध्ये झालेल्या वादातून 18 ऑक्टोबर रोजी ही मारहाणीची घटना घडली होती. ज्यामध्ये पुतण्या अर्जुन निकम हा गंभीर जखमी झाला होता, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 40 दिवसांनंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातील महोदळ इथ शेतीच्या वादातून काकानेच पुतण्याच्या डोक्यात काठीने वार केल्याची घटना घडली. या घटनेत पुतण्याचा उपचारादरम्यान पुतण्याचा मृत्यू झाला. अर्जुन निकम असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोहदळ येथील चंद्रकांत निकम व सूर्यकांत निकम या दोन भावाच्या कुटुंबीयात शेतीचा वाद आहे.
18 ऑक्टोबर रोजी पेरणीसाठी शेतात ट्रॅक्टर नेण्याच्या कारणावरून या दोन्ही कुटुंबात किरकोळ वाद झाला होता. या किरकोळ कारणावरून काकाने पुतण्याच्या डोक्यात काठी घालून जखमी केले. अर्जुन निकम याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु 40 दिवसानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला असून मृतदेह चाकूर पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवून आक्रोश केला. या प्रकरणी काकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकावर खुनाचा गुन्हा दाखल होताच नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
महत्वाची बातमी: गोंदियात शिवशाही बसला भीषण अपघात, 7-8 जणांचा मृत्यू
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world