Ftather Killed Twin Daughtes : राज्यातील बुलढाण्यात सर्वात भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नीसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्याच्या जुळ्या मुलींचा गळा चिरून खून केला. मुलींची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत:पोलिसांकडे गेला आणि गुन्हा कबूल केला. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी आरोपीला तातडीनं अटक केली. राहुल चव्हाण असं आरोपीचं नाव आहे.याप्रकरणी आरोपीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलींचा मृतदेह अंचरवाडी शिवरा येथील जंगलातून ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला.
नराधम बापाने जुळ्या मुलींची हत्या का केली?
पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालं आहे की, दोन्ही मुलांची हत्या करण्याआधी राहुलचं त्याच्या पत्नीसोबत भांडण झालं होतं.यामुळे आरोपी खूप रागात होता. आरोपीने पोलिसांना सांगितलं की, तो पत्नी आणि मुलींना सोबत घेऊन जाणार होता.याचदरम्यान, त्याचं पत्नीसोबत भांडण झालं. त्यानंतर पत्नीने त्याला तिथेच सोडून ती माहेरी गेली. त्यानंतर आरोपी राहुल त्याच्या दोन्ही मुलींना सोबत घेऊन पुढे गेला.
नक्की वाचा >> दिन दिन दिवाळी, जान्हवी रेड्याला ओवाळी! नवऱ्यासोबतचा फोटो अपलोड करताच जान्हवी किल्लेकर झाली ट्रोल
पोलीस तपासात उघड झाली धक्कादायक माहिती
पोलीस तपासात आरोपीने सांगितलं की, पत्नी सोडून गेल्यानंतर तो दोन्ही मुलींना घेऊन थेट बुलढाण्याच्या अंधेरा फाटा येथील जंगलात गेला. तिथे पत्नीसोबत झालेल्या वादानंतर तो खूप रागात होता. त्याने त्याच्या दोन्ही मुलींचा गळा चिरून त्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याला पश्चाताप झाला का की, त्याने हे काय केलं..त्यानंतर तो स्वत: पोलिसांकडे गेला आणि त्याने त्याचा गुन्हा कबूल केला.पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीने दिलेल्या माहितीनंतर पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा दोन्ही मुलींचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. मुलींच्या हत्येनंतर आरोपीने त्यांचा मृतदेह जाळला असावा, असा संशय पोलिसांना आला. दरम्यान, पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नक्की वाचा >> ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूंची भररस्त्यात छेड काढली! रडत रडत टीम मॅनेजमेंटला सांगितलं,पोलिसांनी CCTV पाहताच..