Pune News : सध्या राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीचं वारं वाहत आहे. येत्या १५ जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी पक्ष आणि उमेदवारांकडून जोरदार तयारी केली जात आहे. दरम्यान पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचं नाव हातावर लिहिलं आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. व्यक्तीने असं का केलं याचा शोध घेतला जात आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी हातावर लिहिलं नाव...
पुण्यातील सादिक उर्फ बाबू कपूर या 56 वर्षांच्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या कराण्याआधी त्याने हातावर आणि कागदावर सुसाइड नोट लिहिली आहे. ज्यात त्याने अनेकांची नावं लिहिली आहेत. त्यातील एक नाव अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हडपसर भागातील उमेदवार फारुख शेख यांचं आहे.
सय्यद नगर भागातील पाच गुंठे जमिनीच्या वादातून ही आत्महत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीवर यापूर्वी मोका कायद्याअंतर्गत कारवाई झाली आहे. त्याने ऑफीसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार फारुख शेख यांचं नाव हातावर लिहून सादिक उर्फ बाबू कपूर याने आत्महत्या केली आहे. .
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
