जाहिरात

नवी मुंबईत 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

नवी मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई करत 1 किलोहून अधिकचे एमडी ड्रग्ज पकडले आहे.

नवी मुंबईत 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त
नवी मुंबई:

पुण्यातील एका बारमध्ये अल्पवयीन ड्रग्जचे सेवन करत असल्याची दृश्य पाहिल्यानंतर उभा महाराष्ट्र हादरला होता. शहरी भागात अंमली पदार्थ विकले जातातच शिवाय दूरवरच्या ग्रामीण भागांमध्येही हे अंमली पदार्थ मिळू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये अंमली पदार्थ विक्रेत्यांचे जाळे असल्याचा सातत्याने आरोप केला जातो. यांच्यापर्यंत अंमली पदार्थ कसे येतात हा मोठा प्रश्न आहे. या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई करत 1 किलोहून अधिकचे एमडी ड्रग्ज पकडले आहे. 

हे ही वाचा - अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अटक

नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांना हादरा देत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सलाउद्दीन अलाउद्दीन शेख, फजल जाफर खान या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 किलो 4 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केलेत. या अंमली पदार्थाची किंमत 2 कोटींहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोन्ही आरोपी हे मुंबईतील माहीम भागातील रहिवासी आहेत. सायनकडून पनवेलच्या दिशेने  जाणाऱ्या रस्त्यावर, वाशी गांव बस स्टॉपवर हे दोघे येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून या दोघांना अटक केली. हे अंमली पदार्थ या दोघांनी कुठून आणले याचा पोलीस शोध घेत आहेत. 

अंमली पदार्थ विकणाऱ्या 'आजी'ला अटक

'म्यूल' नावाच्या एका हॉलीवूड चित्रपटमध्ये एक वेगळी कथा हाताळण्यात आली होती. अमेरिकेत 90 वर्षांच्या एका व्यक्तीला अंमली पदार्थांची वाहतूक करताना पकडण्यात आलं होतं. त्यावर आधारीत लेखावर हा चित्रपट बेतलेला आहे. वयोवृद्ध असल्याने या व्यक्तीचा कोणाला संशय येत नव्हता, त्याचा फायदा उचलत त्याने अंमली पदार्थांची तस्करी करणं सुरू ठेवलं होतं. सत्य घटनेवर आधारीत 'म्यूल' चित्रपटात अभिनेते क्लिंट इस्टवूड यांनी वयोवृद्ध तस्कराची भूमिका साकारली होती. हे सांगण्याचं कारण म्हणजे अशीच एक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली होती. पोलिसांनी एप्रिल महिन्यात एका 65 वर्षांच्या महिलेला अटक केली होती. शाळा, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना ती अंमली पदार्थ विकण्याचे काम करत होती. 

हे ही वाचा -  पुण्यातील अल्पवयीन मुलींची घरात दारूपार्टी, तुफान दारू प्यायल्यानंतर एकीची आत्महत्या, दुसरी... 

सलमा शेख असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून ती कल्याण पूर्वेतील हनुमाननगरात राहते. 2015 साली अंमली पदार्थांच्या विक्री प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती आणि  तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर सलमाने पुन्हा अंमली पदार्थ विकण्यास सुरुवात केली. सलमा ही वयोवृद्ध असल्याने तिच्यावर सहसा कोणाला संशय जात नव्हता, याचा फायदा उलचत ती अंमली पदार्थ विकत होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सलमावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. 

शाळेच्या छतावरून 1 महिना पाळत

सलमा काय करते, कोणाला भेटते, अंमली पदार्थ कसे देते हे पाहण्यासाठी पोलिसांनी शाळेची एक इमारत निवडली होती. या शाळेच्या छतावरून पोलीस सलमावर पाळत ठेवत होते. महिनाभर पाळत ठेवल्यानंतर पोलिसांनी सलमाची सगळी माहिती गोळा केली त्यानंतर सलमाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी सलमाकडून 5 लाख 50 हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. सलमा शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ पुरवत होती.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
अंबरनाथमध्ये 6 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग, 23 वर्षाच्या नराधमाला चोपचोप चोपले
नवी मुंबईत 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त
A new twist in the Pune Porsche car accident case, many things have come out in the charge sheet
Next Article
रक्ताच्या नमुन्याची आदला-बदली की अजून काही? पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाचा नवा अँगल