जाहिरात

पुण्यातील अल्पवयीन मुलींची घरात दारूपार्टी; उलट्या केल्या, एकीने गळफास घेतला, दुसरी... 

ही मुलगी अकरावीत शिकत होती, मुलीने स्वत:चा जीव का घेतला, तसेच तिने कधी गळफास घेतला? याचा तपास सुरू आहे.

पुण्यातील अल्पवयीन मुलींची घरात दारूपार्टी; उलट्या केल्या, एकीने गळफास घेतला, दुसरी... 
पुणे:

पुण्यातून वारंवार धक्कादायक (Pune Crime News) घटना समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा दोन अल्पवयीन मुलींसोबत भयंकर घडलं. पुण्यातील येरवडा भागातील दोन अल्पवयीन (16 वर्षे) मैत्रिणींनी घरात दारूपार्टी केली. दारूच्या नशेत त्या दोघींपैकी एकीने गळफास घेत स्वत:चा जीव संपवल्याचा प्रकार घडला. जास्त दारू प्यायल्याने दुसरी मैत्रिण बेशुद्धावस्थेत आढळली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा भागातील दोन मैत्रिणींनी घरी मद्यपार्टी केली. पण त्यातील एका मुलीने गळफास घेऊन स्वत:चा जीव संपवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दुसरी मैत्रीण अतिमद्यसेवनामुळे बेशुद्धावस्थेत आढळली आहे. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नक्की वाचा - पुण्यातला तरुण 6 दिवसांपासून अमेरिकेत बेपत्ता, आई-वडिलांनी केली PM मोदींना विनंती

येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात रहिवासी असलेली 16 वर्षीय मुलगी महाविद्यालयात अकरावीत शिकत होती. तिची आई भाजी विक्रीचा व्यवसाय करते. सोमवारी सायंकाळी या मुलीच्या घरी दोन मैत्रिणींनी मद्यपार्टी केली. त्यानंतर एका मुलीने गळफास घेतला. दुसऱ्या बेशुद्धावस्थेत सापडलेल्या मुलीच्या आई- वडिलांनी तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता मुलगी आणि मैत्रिणींनी मद्य पार्टी केल्याचे उघडकीस आले. या पार्टीनंतर त्यांनी उलट्या केल्या होत्या. मुलीने स्वत:चा जीव का घेतला, तसेच तिने कधी गळफास घेतला? याचा तपास सुरू आहे.

Switch To Dark/Light Mode
Previous Article
ग्राहकांच्या 'त्या' यादीवरुन वाधवान यांची IBBI कडे धाव; ग्राहकांनी मात्र फेटाळले सर्व दावे
पुण्यातील अल्पवयीन मुलींची घरात दारूपार्टी; उलट्या केल्या, एकीने गळफास घेतला, दुसरी... 
Citizens protest in the case of sexual abuse of school children in Badlapur
Next Article
चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी बदलापूरकर संतप्त; शाळेच्या गेटवर पालकांसह नागरिकांना रोखलं