जाहिरात

टवाळखोरी कराल तर थेट धिंड निघणार, 'या'नेत्याने दिले थेट आदेश

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची नावे अणि मोबाईल नंबर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

टवाळखोरी कराल तर थेट धिंड निघणार, 'या'नेत्याने दिले थेट आदेश
सातारा:

बदलापूर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. अनेक ठिकाणी निषेध केला जात आहे. अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहे. तर काही ठिकाणी तिव्र प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. या पार्श्वभूमिवर सुरक्षेच्या सर्वच उपाय योजना केल्या जात आहेत. आता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी आता साताऱ्यात बैठकांचा धडाका लावला आहे. शिवाय शाळा महाविद्यालयात मुलींच्या सुरक्षेचा आढावा ही घेतला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या सातारा जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत शाळा कॉलेज यांना महिलांच्या सुरक्षतेच्या बाबतीत विशेष उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये शाळा कॉलेजमध्ये असणाऱ्या स्वच्छता गृहांच्या एन्ट्री पॉईंट मध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महिला आणि मुलींच्या स्वच्छतागृहाची देखभाल ही महिला कर्मचाऱ्यांनीच करावी असे देखील आदेश देण्यात आले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवार पहिल्यांदाच थेट बोलले, मविआमध्ये नवा ट्विस्ट

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची नावे अणि मोबाईल नंबर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये महिला पथदर्शी प्रकल्प अंतर्गत आतापर्यंत 2021 ला 3819 कारवाया केलेल्या आहेत. गेल्या वर्षभरामध्ये 27 हजार 629 कारवाया या प्रकल्पांतर्गत केलेल्या आहेत. यावर्षी जुलै महिन्यापर्यंत 7693 कारवायांची नोंद आतापर्यंत झालेली आहे. या कारवायांमध्ये ज्या विद्यार्थ्यांवर तीन वेळा कारवाई झाली असेल किंवा वारंवार कारवाई झाली असेल अशा विद्यार्थ्यांची धिंड पोलिसांना काढण्याचे स्पष्ट आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.

ट्रेंडिंग बातमी - 'दोन महिन्यात फाशीची शिक्षा', मुख्यमंत्री शिंदेंच्या त्या वक्तव्यात तथ्य किती? सत्य आले समोर

बदलापूर घटनेनंतर सरकारही सतर्क झाले आहे. शाळांना वेगवेगळ्या उपायोजना करण्यास सांगितल्या जात आहेत. तर मुलींची छेड काढली जात असेल तर तिथे कठोर कारवाईचेही आदेश देण्यात आले आहेत. त्यात शंभूराजे देसाई यांनी तर थेट धिंड काढण्याचेच आदेश दिले आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तींना जरब असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्या आहे. शिवाय कोणी त्रास देत असेल तर त्याची माहितीही पोलीसांना द्यावी असे देसाई यांनी सांगितले आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: