पुण्यातील उद्योजक आणि भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस तपासानुसार, त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती. 9 डिसेंबर 2024 रोजी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सतीश वाघ यांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले. त्यानंतर चालत्या गाडीतच त्यांची तीक्ष्ण शस्त्रांनी हत्या करण्यात आली. ज्यात त्यांच्या शरीरावर 72 वार आढळले. मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून देण्यात आला होता.
नक्की वाचा - Hingoli Crime : हिंगोलीत पोलिसाचा स्वत:च्याच कुटुंबातील सदस्यांवर गोळीबार, पत्नीचा मृत्यू; अनेकजण जखमी
पोलीस तपासात उघड झाले की, मोहिनी वाघ यांचे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते आणि सतीश वाघ हे त्यात अडथळा ठरत होते. त्यामुळे मोहिनी वाघ यांनी पाच लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांच्या पतीची हत्या घडवून आणली.
अटक : या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे:
1. मोहिनी वाघ
2. अक्षय जावळकर
3. विकास शिंदे
4. अतिश जाधव
5. पवनकुमार शर्मा (सुपारी घेणारा)
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून मुख्य सूत्रधार मोहिनी वाघ हिला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांचे शेजारी राहणाऱ्या अक्षय जावळकर यांच्यासोबत प्रेमसंबंध होते, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. सतीश वाघ हे या संबंधात अडथळा ठरत असल्याने, मोहिनी वाघ यांनी पाच लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांच्या पतीची हत्या घडवून आणली. या प्रकरणात मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकरसह इतर तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासानुसार, मोहिनी वाघ या हत्येचा मुख्य सूत्रधार आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world