Mumbai Cyber Fraud News: दिवाळीच्या साफसफाईसाठी ऑनलाईन मोलकरीण शोधणे मुंबईतील एका इव्हेंट प्लॅनमहिलेला चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या घराची साफसफाई तर झाली नाहीच, पण उलट सायबर भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ८६ हजार ८८८ रुपये इतकी मोठी रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, ऐश गुलाटी (वय ३५) या तक्रारदार महिला जोगेश्वरी पश्चिम येथील न्यू लिंक रोड परिसरात राहणाऱ्या इव्हेंट प्लॅनर आहेत. १५ ऑक्टोबर रोजी दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करण्यासाठी त्यांनी दुपारी दोनच्या सुमारास 'अर्बन कंपनी मेड सर्व्हिस' असे गुगलवर सर्च केले. सर्चमध्ये मिळालेल्या एका साईटवरील मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला.
सासरच्या मंडळींची हाव संपेना; 21 वर्षांच्या तरुणीचा दुर्देवी अंत
त्या अनोळखी व्यक्तीने गुलाटी यांना व्हिडिओ कॉल करून एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. मात्र, त्या ॲपचे नाव व मोबाईल क्रमांक त्यांना आठवत नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. या घटनेनंतर २३ ऑक्टोबर रोजी ऐश गुलाटी यांचे सिम कार्ड अचानक बंद झाले. त्यांनी संबंधित गॅलरीमध्ये जाऊन सिम कार्ड पुन्हा सुरू करून घेतले. मात्र, त्याच रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
लाखोंचा गंडा
सायबर भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ८६ हजार ८८८ रुपये काढले होते. यानंतर ऐश गुलाटी यांनी तातडीने सायबर सेल तसेच ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. ऑनलाईन सेवा घेताना नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असा इशारा यानिमित्ताने देण्यात आला आहे.
Woman Molestation News: आणखी एका पोलिसाचं तत्काळ निलंबन, भररस्त्यात महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world