जाहिरात

Mumbai News: घरामध्ये चक्क पाळली मगर, रेस्क्यू ऑपरेशनचा थरार! मुंबईतील जुहूमध्ये खळबळ

Mumbai News: मुंबईतील जुहू परिसरात खळबळजनक घटना घडलीय. एका तरुणाने घरामध्ये चक्क मगर पाळल्याची माहिती समोर आलीय.

Mumbai News: घरामध्ये चक्क पाळली मगर, रेस्क्यू ऑपरेशनचा थरार! मुंबईतील जुहूमध्ये खळबळ
"Mumbai News: तरुणाने घरामध्ये पाळली मगर"
प्रतिकात्मक फोटो (Canva)
  • जुहू परिसरातील एका घरात बेकायदेशीर मगर आणि कासव ठेवल्याचा प्रकार उघडकीस
  • दोन्ही प्राणी सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले
  • आरोपी इमरान शेखविरोधात गुन्हा दाखल
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

- पारस दामा, प्रतिनिधी

Mumbai News: मुंबईतील जुहू परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने घरामध्ये बेकायदेशीररीत्या मगर आणि कासव पाळल्याचा प्रकार उघडकीस आलाय. वन विभाग, मुंबई क्राइम ब्रँच युनिट-9 आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त कारवाईत दोन्ही प्राण्यांना सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले आहे. या प्रकरणी 29 वर्षीय इमरान शेखविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुहू परिसरातील एका घरामध्ये मगर ठेवण्यात आल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार अंधेरी रेंज कार्यालयाशी संबंधित फॉरेस्ट गार्ड रोशन बिंदे यांनी क्राइम ब्रँच युनिट-9 शी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस, वन विभाग आणि सर्प इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई केली.

(नक्की वाचा: Jalna News: जालन्यात दहशत! हॉटेलसमोर लिंबू, हळदकुंकू, बाहुल्या, चिठ्ठ्यांमध्ये प्रतिष्ठित लोकांची नावं; काळ्या जादूनं गावं हादरलं)

जुहूतील घरावर छापेमारी

3 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 4.50 वाजता पथक जुहू येथील जे. आर. म्हात्रे मार्गावरील रुइया पार्क, मोरागाव शंकर चाळ येथे पोहोचले. ठोस माहिती मिळाल्यानंतर या घरावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान साक्षीदारही उपस्थित होते. 

घराचा दरवाजा उघडल्यावर तेथे एक महिला आणि एक तरुण आढळून आले. शाहिदा शेख आणि तिचा भाऊ इमरान शेख अशी त्यांची नावं आहेत. झडतीदरम्यान घरातील एका छोट्या खोलीत ठेवलेल्या काचेच्या टँकमध्ये एक जिवंत भारतीय मगर आणि इंडियन स्पॉटेड टर्टल (ठिपकेदार कासव) आढळून आले. हे दोन्ही प्राणी वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या अनुसूची-1 मध्ये समाविष्ट आहेत, अशा प्राण्यांना खासगी स्वरूपात घरामध्ये ठेवणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. 

(नक्की वाचा: Latur News: एकाच खोलीत मायलेकी 2 वर्षे कैदेत! लातूरमधील घटनेने महाराष्ट्र हादरला, अमानवी कृत्य उघड)

दोन्ही प्राणी वनविभागाच्या ताब्यात

रेस्क्यू टीमने अत्यंत काळजीपूर्वक दोन्ही प्राण्यांना सुरक्षित पिंजऱ्यातून बाहेर काढले. या संपूर्ण कारवाईचे डिजिटल रेकॉर्डिंगही करण्यात आले. चौकशीत शाहिदा शेख हिने सांगितले की, हे प्राणी तिचा भाऊ इमरान घरी घेऊन आला होता, तर इमरान या बाबत माहिती देताना टाळाटाळ करत होता. यानंतर पोलिसांनी इमरान इस्माईल शेख याच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या कलम 9, 39, 48 आणि 51 अंतर्गत गुन्हा नोंदवलाय. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. रेस्क्यू करण्यात आलेली मगर आणि कासव वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com