
Tamil Nadu News : 'माझा नवरा नेत्यांना मुली पुरवतो. मलाही इतर पुरुषांसोबत झोपायला लावतो, असा धक्कादायक आरोप तामिळनाडूतील 20 वर्षांच्या महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणातील आरोपी तामिळनाडूमधील सत्तारुढ द्रमुक (DMK) पक्षाचा नेता आहे. त्याची आता पक्षानं हकालपट्टी केली आहे. मात्र, त्याच्या पत्नीने केलेल्या या खळबळजनक आरोपामुळे दक्षिण भारतीय राज्य तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप आला आहे. अण्णाद्रमुकने (AIADMK) या गंभीर प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची आणि सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. असे न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. भाजपही या प्रकरणी सरकारला लक्ष्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुसरीकडे, राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. आरोपींच्या राजकीय संबंधांची चौकशी करण्याची मागणी महिला आयोगाने केली आहे. तामिळनाडूच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या या भूकंपाची संपूर्ण कहाणी जाणून घ्या.
कोण आहे आरोपी?
तामिळनाडूतील एका 20 वर्षांच्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे गंभीर प्रकरण उघडकीस आले. महिलेने आपल्या तक्रारीत सांगितले की, तिचा पती देइवासेयाल नेत्यांना मुली पुरवतो. तो अरक्कोणममध्ये द्रमुक युवा शाखेचा उपसचिव आहे, असंही या महिलेनं तक्रारीत स्पष्ट केलं आहे.
( नक्की वाचा : Yavatmal News: मुख्याध्यापिका आणि शिक्षकाचं लव्ह मॅरेज, वर्षभरातच खेळ संपला! विद्यार्थ्यांच्या मदतीनं नवऱ्याची हत्या )
तक्रार केल्यावर 'तुकडे तुकडे' करण्याची धमकी
या महिलेने तिच्या तक्रारीत सांगितले की, पतीने तिचा लैंगिक आणि शारीरिक छळ केला. मारहाण केली, माझा फोन तोडला. तसेच तिच्याविरुद्ध कोणतीही कारवाई होणार नाही, असेही त्याने धमकावले. 'माझ्या पतीचे काम 20 वर्षांच्या महिलांना धमकावून राजकीय नेत्यांसोबत झोपायला लावणे आहे. जेव्हा मी तक्रार केली, तेव्हा मला 'तुकडे तुकडे' करण्याची धमकी देण्यात आली.'
आरोपीवर द्रमुक पक्षाची कारवाई
पीडित महिलेने असेही म्हटले आहे की, तिच्या पतीने तिला 'तो माणूस दाखवेल त्याच्यासोबत झोप' असे सांगितले. हा गंभीर आरोप समोर आल्यानंतर द्रमुकच्या युवा शाखेने एक निवेदन जारी करून आरोपी देइवासेयालला पक्षाच्या पदावरून हटवण्यात आल्याचे म्हटले आहे.
( नक्की वाचा : रस्त्याच्या बाजूला पडलेल्या मुलीला दिलं नवं आयुष्य! तिनेच घेतला आईचा जीव! Instagram नं समोर आलं सत्य )
अण्णाद्रमुकचा गंभीर इशारा
दरम्यान, अण्णाद्रमुकचे सरचिटणीस एडप्पादी के. पलानीस्वामी यांनी या गंभीर प्रकरणात एफआयआर (FIR) दाखल होण्यास उशीर झाल्याबद्दल पोलिसांवर टीका केली आहे. देइवासेयालच्या तावडीत अनेक 20 वर्षांच्या महिला-तरुणी आहेत, अशा परिस्थितीत द्रमुक सरकार महिलांचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करेल का, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. योग्य कारवाई न झाल्यास लोकांसोबत मोठे आंदोलन करू, असे अण्णाद्रमुकच्या सरचिटणीसांनी स्पष्ट केले आहे.
पीडितेचा पोलिसांवर आरोप
तक्रार करणाऱ्या महिलेने पोलिसांच्या उदासीनतेचा आरोप करत एक व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. त्यात ती म्हणत आहे की, 'माझा व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये माझा चेहरा समोर आला आहे. माझे वडील आजारी आहेत आणि मला हे सांभाळणे शक्य नाही. पोलीस घरी येऊन फोटो काढत आहेत, पण कारवाई करत नाहीत. तक्रार दाखल करून 48 तास झाले आहेत, पण एफआयआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मी आत्महत्या करेन.'
महिला आयोगाने मागवला अहवाल
या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने एका निवेदनात “तत्काळ, निष्पक्ष आणि पारदर्शक” चौकशीची मागणी केली आहे. महिला आयोगाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'पीडितेची सुरक्षा निश्चित करण्यासाठी, एका स्वतंत्र चौकशी पथकाची स्थापना करणे आणि कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला रोखणे महत्त्वाचे आहे.' महिला आयोगाने ३ दिवसांच्या आत एफआयआरच्या प्रतीसह कारवाई अहवालही मागवला आहे.
हे प्रकरण तामिळनाडूच्या राजकारणात आणखी काय घडामोडी घडवते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world