
संजय तिवारी
वाहतुक पोलिसांना चक्रावून सोडणारी एक घटना नागपूरात घडली आहे. नागपूरात फिरत असलेल्या एक मर्जिडीज गाडीचे चलान नेहमी काटले जात होते. पण ते चलान नागपूरात नाही तर थेट शेकडो किलोमीटर दुर असलेल्या ठाण्यात जात आहे. ठाण्यात असलेला मालक ते चलान पाहून हैराण होत होता. आपली गाडी नागपूरात गेलीच नाही तरी तिथून आपलं चालान कसं येतं? हा प्रश्न त्यांना पडला होता. याची माहिती त्यांना नागपूर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसही चक्रावून गेले. पण ज्या वेळी त्यामागचे सत्य समोर आले त्यानंतर सर्वच जण आवाक झाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नागपूरात राहाणार एक तरुण मर्सिडीज कार वापरत होता. आपल्या गाडीवर चलान काटले जावू नये म्हणून त्याने एक अजब गजब आयडीया केली. पण ही आयडियात शेवटी त्याच्यात अंगाशी आली. त्याला ही भलती सलती आयडिया महागात पडली. त्याने आपल्या गाडीची खोटी नंबर प्लेट लावली होती. त्यानंबर प्लेटची गाडी ही नागपूरात नाही तर थेट ठाण्यात होती. त्यामुळे ही गाडी ज्या ज्यावेळी वाहतुकीचे नियम तोडत होती, त्या त्यावेळी चलान काटले जात होते. शिवाय ते चालान ठाण्याला जात होते.
या चलान मुळे ठाण्याचे रहिवाशी असलेले अरोरा हे गेल्या चार महिन्यांपासून त्रस्त झाले होते. त्यांना त्यांच्या वाहनासाठी नागपूर वाहतूक पोलिसांचे वारंवार चलान येत होते.मात्र, यात मेख अशी होती की ते आणि त्यांचे चार चाकी वाहन ठाण्यातच होते. अशा वेळी नागपुरातून चालान कसे असा प्रश्न त्यांना पडला होता. पण तरीही त्यांना ठाणे येथे सातत्याने वाहतूक नियमांचा भंग केल्याचे चालान मिळत होते. हे चलान चक्क एका महागड्या मर्सिडीज कारचे होते.
ट्रेंडिंग बातमी - Rane vs Rane: 'राणे बंधू एकमेकांच्या उरावर बसणार' माजी खासदार असं का बोलले?
पण अरोरा यांच्याकडे पांढरी मर्सिडीज कार नव्हती. त्यामुळे आपल्या कारच्या नंबरचा कुणी तरी गैर वापर करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी नागपूर पोलिसांना संपर्क करून कुणीतरी आपली नंबर प्लेट पांढऱ्या मर्सिडीज वर अवैधरित्या वापरत आल्याचे कळविले. त्यानंतर नागपूर पोलिसांनी त्या मर्सिडीजचा शोध घेतला. शिवाय त्या गाडीचा नंबर आपल्या डेटा बेसमध्ये संशयास्पद वाहन या श्रेणीत टाकून ठेवला होता. तरी पण ही गाडी काही केल्या सापडत नव्हती.
शेवटी, एका पोलिस हवालदाराच्या सतर्कतेने ती पांढरी मर्सिडीज सापडली. त्याचा 25 वर्षीय चालक मालक याला ताब्यात घेण्यात आले. त्याने आपल्यामागे चलानचा ससेमिरा नको म्हणून, दुसऱ्या वाहनाची नंबर प्लेट वापरली होती. साधे चलान टाळण्यासाठी त्याने लढविलेली ही शक्कल त्याला खूप महागात पडली. आता त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याची महागडी कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे. आता न्यायालयाचा आदेश येईपर्यंत त्याची मर्सिडीज जप्त राहणार आहे. त्याला वारंवार कोर्टाच्या पायऱ्या देखील चढाव्या लागणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world