जाहिरात

Nagpur Crime: गर्लफ्रेंडचे लाड पुरवण्यासाठी करायचा 'असा' कांड; नागपुरात इंस्टाग्राम स्टारच्या टोळीला अटक!

मात्र, पेट्रोल संपले आणि जवळ पैसे नसले तर ते चोरलेली मोटार सायकल रस्त्यावर तिथेच सोडून निघून जात असत, असे निदर्शनास आले होते. 

Nagpur Crime: गर्लफ्रेंडचे लाड पुरवण्यासाठी करायचा 'असा' कांड;  नागपुरात इंस्टाग्राम स्टारच्या टोळीला अटक!

संजय तिवारी, नागपूर: चार गर्लफ्रेंड असलेल्या एका अल्पवयीन मुलाला नागपूर येथे दुचाकी चोरी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर तरुण सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चार प्रेयसींना इंप्रेस करण्यासाठी आणि त्यांना सैर सपाटा घडवून आणण्यासाठी तो मोटार सायकली चोरत असे. नागपूर येथील पाचपावली पोलिस ठाण्याच्या पथकाने मोटर सायकली चोरणाऱ्या पाच जणांना  ताब्यात घेतले असून यात हा अल्पवयीन देखील आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, या पाच जणांच्या गँगमध्ये चार अल्पवयीन असून एक वयाची एकवीस वर्षे पूर्ण केलेला आहे.  वेगवेगळ्या ठिकाणी बाइक्स चोरून चोरलेल्या मोटरसायकलवर फोटो व्हिडिओ घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करत असत. ते विशेषतः इंस्टाग्रामवर रील पोस्ट करत आणि त्या माध्यमातून आपली प्रसिद्धी मिळवत होते. मात्र, पेट्रोल संपले आणि जवळ पैसे नसले तर ते चोरलेली मोटार सायकल रस्त्यावर तिथेच सोडून निघून जात असत, असे निदर्शनास आले होते. 

पोलिसांनी अथक परिश्रम करत या पाच जणांना ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. याशिवाय त्यांनी चोऱ्या आणि घरफोड्या देखील केल्याचे उघडकीस आले आहे. चोरी केलेल्या बाइक्स आणि चोरीतून मिळविलेल्या पैशांच्या जोरावर गर्लफ्रेंडसना आकर्षित करणे आणि पैसे उधळणे हा त्यांचा नित्यक्रम होता. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीत अकरा गुन्हे उघडकीस आले आहेत.

( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )

यामध्ये नऊ बाईक चोरी आणि खापरखेडा भागातील दोन धाडसी चोऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा तपास सुरू आहे. या पोलिस तपासामुळे त्यांच्या जॉय राईड ला सध्यातरी  ब्रेक लागलेला आहे हे मात्र निश्चित. दरम्यान, चोरट्या रिलस्टार टोळीची सध्या परिसरात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. 

Cricketer Death: मदतीसाठी धावा पण.. भारतीय क्रिकेटपटूचा ट्रेनमध्ये मृत्यू, मित्रांच्या डोळ्यादेखत तडफडून जीव गेला!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com