जाहिरात

Nagpur News : बारमध्ये तुडुंब जेवण अन् 10 रुपयांवरुन जोरदार हाणामारी, नागपुरात काय घडलं?

नागपुरात एका सिगारेटवरुन मोठा राडा, दोन गट भिडले..

Nagpur News : बारमध्ये तुडुंब जेवण अन् 10 रुपयांवरुन जोरदार हाणामारी, नागपुरात काय घडलं?
AI Image

Nagpur News : नागपूर शहरातील टेका नाका परिसरातील मेट्रो स्टेशनखाली असलेल्या एका बारजवळ सोमवारी मध्यरात्री दोन गटात जोरदार राडा झाला होता. सिगारेट खरेदीवरुन झालेल्या वादात एकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यातील आठ हल्लेखोरांपैकी सहा जणांना अटक करण्यात यश आलं आहे. उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या हाणामारीत शेख अखील शेख जलील आणि आसिफ शेख बशीर हे दोघे जखमी झाले आहेत. यापैकी जलील याला गंभीर जखमा झाल्याची माहिती आहे.

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही गट एकाच बारमध्ये वेगवेगळ्या टेबलांवर जेवण करत होते. जेवण आटोपून बाहेर आल्यानंतर एका गटातील तरुण सिगारेट विकत घेत होता. त्यावेळी दुसऱ्या गटातील जलील याने त्याला, "माझ्यासाठी पण एक सिगारेट घे," असं म्हटले. यावर तरुणाने "मी तुला सिगारेट का घेऊन देऊ?" असं विचारल्यामुळे त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली.

नक्की वाचा - Pune News : तब्बल 27 तास तरुणाचा छळ; बापाच्या सतर्कतेमुळे मोठा बनाव उघड, नागरिकांना अलर्ट करणारं पुणे प्रकरण

सिगारेटवरुन जोरदार हाणामारी...

हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही बाजूंनी आपल्या ओळखीच्या लोकांना घटनास्थळी बोलावून घेतलं. ज्यामुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली. या वादातून पुढं दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या भांडणाचं चित्रीकरण केलं आणि आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कपिल नगर पोलिसांनी या घटनेची नोंद करून तपासाला सुरुवात केली. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतलं असून इतर दोन संशयितांचा शोध सुरू आहे. उर्वरित दोन आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com