जाहिरात

बाप नाही वैरी! नराधम बापानेच लेकी बरोबर केले नको ते कृत्य, पुढे भयंकर घडलं

राज्याच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात अशा अप्रिय घटना ह्या घडतच आहेत. त्यात भर म्हणजे नंदूरबारमध्ये ही सर्वांना हादरवून सोडणारी घटना घडली आहे.

बाप नाही वैरी! नराधम बापानेच लेकी बरोबर केले नको ते कृत्य, पुढे भयंकर घडलं
नंदूरबार:

मुली आणि महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना थांबता थांबण्याचे नाव घेत नाही. बदलापूर प्रकरणानंतर या गोष्टींना आळा बसेल. नराधमांना पोलीसांचा धाक निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसं होताना दिसत नाही. बदलापूर प्रकरणानंतर तर एका मागून एक घटना राज्यात घडत आहेत. राज्याच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात अशा अप्रिय घटना ह्या घडतच आहेत. त्यात भर म्हणजे नंदूरबारमध्ये ही सर्वांना हादरवून सोडणारी घटना घडली आहे. इथे जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे.   

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नंदुरबार जिल्ह्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसात तीन गुन्हे समोर आले आहेत. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे अल्पवयीन मुलीवर वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटनाही समोर आली आहे. अत्याचार केल्यामुळे ती मुलगी गर्भवती राहीली आहे. त्यामुळे हीबाब उघड झाली. तो पर्यंत ही मुलगी सर्व आत्याचार सहन करत होती. या प्रकरणानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - मालेगावात गाऊन गँगचा धुमाकूळ ! चोरीसाठी नवा फंडा, नागरिकांमध्ये भीती

नराधम बापाला मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अटक करण्यात आली आहे. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील 40 वर्षीय पित्याने एप्रिल 2024 ते जुलै दरम्यान स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. राहत्या घरी ती एकटी असताना तो तिच्यावर अत्याचार करत होता. कोणाला सांगितलं तर मारून टाकेन अशी धमकीही त्याने दिली होती. पण ती गर्भवती राहील्याने नराधम बापाचं बिंग फुटलं. 

ट्रेंडिंग बातमी - विधानसभेला किती जागा लढणार? अजित पवारांनी पहिल्यांदाच आकडा सांगितला

धमकी दिल्यामुळे मुलगी घाबरली होती. ती तिच्यावर होणारे अत्याचार सहन करत होती. मात्र, एक दिवस पोट दुखत असल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले. त्यानंतर ती गर्भवती असल्याचे समोर आले.  त्याबाबत तिला विचारले असता मुलीने वडिलांनीच अत्याचार केल्याचे सांगितले. त्यामुळे आई हादरली. त्यानंतर आपल्या मुलीसह शहादा पोलिस स्टेशन गाठत  गुन्हा दाखल केला. आईच्या फिर्यादीवरून संशयिता विरोधात पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखलकरून त्याला अटक करण्यात आले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: