
किशोर बेलसरे
आई वडील हे मोलमजुरीचं काम करतात. ते कामासाठी बाहेर गेले होते. त्याच वेळी नराधमांनी एक दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. त्याबाबतची तक्रार नाशिकच्या निफाडमध्ये दाखल ही करण्यात आली. मुलगी ही अल्पवयीन असल्याने तीचे जबाब बदलत होते. शिवाय ती कुणालाही ओळखत नव्हती. अशा वेळी आरोपींना शोधण्याचे आव्हान पोलिसां समोर होते. पोलिसांनी सामूहित अत्याचाची केस दाखल ही केली होती. पण तपासात वेगळी माहिती समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओझर येथील रामजी नगर परिसरात शिरसगाव इथं ही घटना घडली आहे. मोलमजूरी करण्यासाठी पीडित मुलीचे आई-वडील हे बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची दहा वर्षाची मुलगी ही घरी एकटी होती. ही संधी साधत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. शिवाय तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. याबाबत तक्रारी वरून ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अत्याचार करून फरार झाले होते. त्यामुळे सामूहिक अत्याचारात किती जण होते. कोण होते हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यामुळे पोलिसांची पथकं तयार करण्यात आली. त्यांनी आरोपींचा शोध घेतला. काही संशयितांचे फोटो ही मुलीली दाखवण्यात आले. पण ती कुणालाही ओळखत नव्हती. त्यामुळे तपासाला चालना मिळत नव्हती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एक महत्वाचा सुगावा लागला. त्यानंतर हा सामूहित अत्याचार नसल्याचं समोर आलं आहे.
त्या अल्पवयीन मुलीवर एका अल्पवयीन मुलानेच अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस उपाधीक्षका अद्विता शिंदे, पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर,अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिर्लेकर, क्राईम ब्रँच राजू सुर्वे यांच्या सह ओझर पोलीस स्टेशनचे तपासी पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाय मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्नाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world