जाहिरात

Crime News: दोघात तिसरा आला, त्याला हातोड्याने संपवला, पण अपघातामुळे प्रेमीयुगुलाचे बिंग फुटलं

Mumbai Crime News: दोघांच्या प्रेमामध्ये अडसर ठरत असल्याने ही हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाचं म्हणजे एका अपघातामुळे या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला. 

Crime News: दोघात तिसरा आला, त्याला हातोड्याने संपवला, पण अपघातामुळे प्रेमीयुगुलाचे बिंग फुटलं

मुंबई: सध्या सुरु असलेल्या हत्या, अत्याचार अन् गुन्हेगारीच्या घटना पाहून राज्यात नेमकं चाललंय काय? असा सवाल होत आहे. छोट्या छोट्या कारणांवरुन लोक एकमेकांच्या जिवावर उठल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशीच धक्कादायक घटना मुंबईमधून समोर आली असून नवी मुंबईत एका प्रेमी युगुलाने कॅब चालकाची निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशाी की,  नवी मुंबईतील उलवे इथं एका कॅबचालकाची हातोड्याने घाव घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुरेंद्र पांडे असे मृत कॅब चालकाचे नाव आहे तर  रिया दिनेश सरकल्याणसिंग (19) आणि तिचा प्रियकर विशाल संजय शिंदे अशी हत्या केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्रेमीयुगुलावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी कॅब चालकाच्या हत्येची कबुली दिली आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दोघांच्या प्रेमामध्ये अडसर ठरत असल्याने ही हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाचं म्हणजे एका अपघातामुळे या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला. 

समोर आलेल्या माहितीनुसार,  रिया दिनेश सरकल्याणसिंग आणि मृत सुरेंद्र पांडे हे मुंबईच्या उलवे इथे राहत होते. सुरेंद्र पांडेची कॅब असल्याने त्यांची ओळख झाली. त्याच कॅबमधून रिया दिनेश सरकल्याणसिंग (19) आणि तिचा प्रियकर विशाल संजय शिंदे पुण्याला ये- जा करत होते, त्यामुळे त्यांची चांगली ओळख होती.

(नक्की वाचा-  Shirdi News : फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी)

मात्र रियाला सुरेंद्र पांडे हा ब्लॅकमेल करत होता तशी तक्रार तिने प्रियकर विशाल शिंदेकडे केली होती. 2 एप्रिल रोजी विशाल शिंदे हा रियाच्या घरी गेला असता तिथे त्याने सुरेंद्र पांडेला पाहिले. दोघांच्या प्रेमात सुरेंद्र पांडेचा अडसर ठरत असल्याने दोघांनी त्याची हत्या करायचे ठरवले त्यानुसार त्यांनी डोक्यात हातोडा घालून सुरेंद्रचा खून केला. 

हत्येनंतर रिया आणि विशाल त्याचीच कार घेऊन पुण्याला आले, त्यानंतर ते नाशिकलाही गेले. मात्र त्यांच्याकडून नाशिकमध्ये  गाडीचा अपघात झाला आणि या संपूर्ण हत्याकांडाचा खुलासा झाला. कारच्या अपघातानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. गाडीच्या मूळ चालकाची चौकशी केली असता कॅबचालक पांडेच्या हत्येची कबुलीच दोघांनी दिली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

Tanisha Bhise Death: मंगेशकर हॉस्पिटलचा निर्दयीपणा! तनिषा भिसेंंच्या मृत्यूला जबाबदार कोण? अहवालात धक्कादायक खुलासा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: