जाहिरात

Navi Mumbai News: नवी मुंबईकरांनो सावधान! तुम्हीही पनवेलमध्ये रिक्षाने प्रवास करताय? महिलेसोबत भयंकर घडलं

Navi Mumbai News: पनवेलमध्ये एका महिलेसोबत अतिशय भयंकर प्रकार घडल्याची माहिती समोर आलीय.

Navi Mumbai News: नवी मुंबईकरांनो सावधान! तुम्हीही पनवेलमध्ये रिक्षाने प्रवास करताय? महिलेसोबत भयंकर घडलं
"Navi Mumbai News: नवी मुंबईमध्ये महिलेसोबत भयंकर घडलं"
Canva

- राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai News:
पनवेलमध्ये एका महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडलाय. करंजाडे परिसरात एका रिक्षा चालकाने महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपीने महिलेकडून तब्बल 3 लाख 71 हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 11 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सोमनाथ भोईर यांच्या पत्नी संगीता भोईर (वय 36 वर्षे) या पनवेलहून रिक्षाने घरी परतत होत्या. करंजाडे येथील सत्यं ट्रायडंट बिल्डिंगजवळील सर्व्हिस रोडवर पोहोचल्यानंतर रिक्षा चालकाने 'रिक्षा बंद पडली आहे' असे सांगून वाहन थांबवले.

चाकूने वार करून केली लूट

रिक्षा थांबवल्यानंतर चालकाने अचानक धारदार चाकू काढून संगीता यांच्या गळ्यावर, छातीवर आणि पायावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर आरोपीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 71 हजार रुपयांचा माल जबरदस्तीने हिसकावून रिक्षेसह पळ काढला.

(नक्की वाचा: Pune Crime Alert: गुंड मोकाट, पुणेकर धास्तावले! गुंडांचा मध्यरात्री तलवारींनी तांडव आणि दगडफेक, पाहा VIDEO)

लुटण्यात आलेल्या वस्तूंचा तपशील 
  • सोन्याचे मंगळसूत्र (25 ग्रॅम): 3 लाख रुपये 
  • सोन्याची साखळी (6 ग्रॅम): 60 हजार रुपये 
  • विवो मोबाइल फोन: 5 हजार रुपये
  • रोख रक्कम आणि पर्स: 6 हजार रुपये

(नक्की वाचा: Crime News: मुंबई हादरली! भरदिवसा 19 वर्षांच्या तरुणीची गोळ्या झाडून हत्या, कारण वाचून बसेल धक्का)

पोलीस तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सध्या या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे. जखमी महिलेवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पनवेल परिसरात वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात केले आहे. नागरिकांनी अनोळखी रिक्षा किंवा वाहनांमध्ये बसताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com