जाहिरात

Beed News : अंबाजोगाईत राष्ट्रवादीच्या नेत्याला जबर मारहाण; शर्टावर रक्ताचे डाग, डोक्याला...रुग्णालयासमोर राडा

Beed News : अंबाजोगाईतल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज मोठा राडा पाहायला मिळाला.

Beed News : अंबाजोगाईत राष्ट्रवादीच्या नेत्याला जबर मारहाण; शर्टावर रक्ताचे डाग, डोक्याला...रुग्णालयासमोर राडा

Beed News : अंबाजोगाईतल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज मोठा राडा पाहायला मिळाला. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दलाच्या जवानांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष ॲड. इस्माईल गवळी आणि एका ऑटो चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये शहराध्यक्षांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आणि डोक्याला पट्टी बांधल्याचं दिसून येत आहे. 

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दोघांमध्ये झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या गवळी यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून दोषींवर कारवाईची मागणी जोर धरत आहे
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com