NEET Paper Leak 2026: नीट (NEET UG 2026) पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने (CBI) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत लातूर येथील 'आरसीसी' कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याला अटक केली आहे. तपासादरम्यान मोटेगावकरच्या मोबाइलमध्ये फुटलेल्या प्रश्नपत्रिका सापडल्या असून, त्याने अन्य आरोपींशी संगनमत करून हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोटेगावकरवर भारतीय न्याय संहिता (BNS), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
(नक्की वाचा: NEET Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी आणखी एका मास्टरमाईंडला अटक, पुण्यातील 'ती' शिक्षिका गजाआड)
सीबीआयनं शिवराज मोटेगावकरला अटक का करण्यात आली, यामागील कारण.... | Why CBI arrested Shivraj Motegaonkar? Read 10 Important Reasons
- शिवराज रघुनाथ मोटेगावकरचा नीट यूजी परीक्षा प्रश्नपत्रिका-2026 फुटी प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग
- पेपर प्रसारित करणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य आहेत
- इतर आरोपींसोबत संगनमत करून परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मिळवली
- शिवराज रघुनाथ मोटेगावकरच्या निवासस्थानी केलेल्या झडतीदरम्यान शिवराज मोटेगावकरच्या मोबाइलमध्ये नीट यूजी 2026चे फुटलेले प्रश्न सापडले
- 14 मे रोजी लातूर येथील शिवाजी नगरमधील मोटेगावकरच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली होती
- फॉरेन्सिक तपासणीसाठी मोबाइल जप्त करण्यात आला
- एनटीएशी (NTA) संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसोबत गुन्हेगारी रचला
- शिवराज रघुनाथ मोटेगावकरने फुटलेल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या प्रती विवेक पाटील आणि इतरांसह अनेक व्यक्तींना पुरवल्या
- फुटलेल्या नीट यूजी परीक्षा 2026च्या प्रश्नपत्रिकांच्या हस्तलिखित प्रती ज्या-ज्या व्यक्तींना पुरवल्या होत्या, त्या सर्वांची नावे उघड केलेली नाहीत
- तपासादरम्यान असेही समोर आले आहे की, आरोपीने परीक्षा झाल्यानंतर फुटलेल्या प्रश्नपत्रिका नष्ट करून पुरावा नष्ट केला
(नक्की वाचा: NEET पेपरफुटीचं लातूर-पुणे कनेक्शन नेमकं काय? पी.व्ही.कुलकर्णी खरा मास्टरमाईंड? वाचा INSIDE STORY )
शिवराज मोटेगावकरवर कोणत्या कलमाअंतर्गत कारवाई? | Under which sections action has been taken against Shivraj Motegaonkar?
- BNS, 2023 च्या कलम 61(2), 238, 303(2), 316(5), 318(4), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा
- 1988 (2018 मध्ये सुधारित) च्या कलम 13(2) सह 13(1)(अ) आणि सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) कायदा
- 2024 च्या कलम 10 सह 3, 4, 5 आणि कलम 11 अन्वये शिक्षापात्र गुन्हे दाखल आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world