जाहिरात

C. Sambhajinagar : माजी सरपंचाच्या न्यायासाठी गावकरी एकजूट; 11 आरोपींची अरेरावी एक झटक्यात ठेचली!

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरजवळील ओहर गावात जमिनीच्या वादातून माजी सरपंचांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

C. Sambhajinagar : माजी सरपंचाच्या न्यायासाठी गावकरी एकजूट; 11 आरोपींची अरेरावी एक झटक्यात ठेचली!

​Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरजवळील ओहर गावात जमिनीच्या वादातून माजी सरपंचांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. मंगळवारी ओहर ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावली होती, ज्यामध्ये गावकऱ्यांनी मुख्य आरोपीच्या मनमानी कारभाराविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. या सभेत सर्वसंमतीने ठराव मंजूर करून आरोपींनी गावातील मुख्य चौकात केलेले अवैध दुकान आणि अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आले.

​दहशतीचे केंद्र ठरलेले 'अवैध दुकान'

​आरोपींनी गावाच्या मुख्य चौकात अतिक्रमण करून दुकान थाटले होते, जिथे दररोज टवाळखोर मुलांचा वावर असायचा. यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते आणि गावात दहशतीचे वातावरण होते. हत्येच्या घटनेनंतर गावकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटला आणि त्यांनी या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवला.

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगर हादरलं! गोदाकाठावर आढळला अर्धवट कुजलेला मृतदेह; पोलिसांसमोर मोठं आव्हान

नक्की वाचा - Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगर हादरलं! गोदाकाठावर आढळला अर्धवट कुजलेला मृतदेह; पोलिसांसमोर मोठं आव्हान

​आणखी ४ आरोपींना बेड्या

​या हत्याकांडातील मुख्य आरोपीसह इतर काही लोक आधीच ताब्यात असताना पसार असलेल्या आणखी चार आरोपींना हर्षूल पोलिसांनी अटक केली आहे. ​अटक करण्यात आलेल्यांची नावे: जमीर इनायत पठाण, मोईन इनायत पठाण, फुर खान अजगर खान पठाण आणि अस्लम खान उर्फ गुड्डू गयाज खान पठाण.

​पोलीस कोठडी: या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

​एकाच कुटुंबातील ११ जणांचा समावेश

​तपासात समोर आले आहे की, जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तब्बल ११ जणांनी मिळून माजी सरपंचाचा काटा काढला होता. या घटनेनंतर ओहर गावात तणावाचे वातावरण असून पोलीस इतर उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com