मोसिन शेख, छत्रपती संभाजीनगर
लोकसभा निवडणुकीदरम्यान ईव्हीएमबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ईव्हीएम मशीन हॅक करतो सांगून सैन्यात हवालदार असलेल्या व्यक्तीने ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे तब्बल अडीच कोटी रुपयांची मागणी केली आहे. अंबादास दानवे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांना आरोपीला अटक केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मारुती ढाकणे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. शहरातील गोल्डन हॉटेलमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला 1 लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मारुती ढाकणे हा सैन्यात हवालदार असून डोक्यावर खूप कर्ज झाल्याने त्यांने असा फसवणुकीचा प्रयत्न केला आणि फसला.
नक्की वाचा- EVM ची पूजा करणे महागात पडलं, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल
काय म्हणाले अंबादास दानवे?
अंबादास दानवे यांनी याबाबत म्हटलं की, आरोपी मला पाच-सहा महिन्यांपासून फोन करत होता. मी ईव्हीएम मशीन हॅक करतो आणि त्यात चिप बसवून मतांची हेराफेरी करतो, असं तो सांगत होता. मात्र मला त्यावर विश्वास नव्हता. मला हे आधीपासून माहिती होतं त्यामुळे वारंवार मी त्याला टाळत होतो. आरोपीने माझ्याकडे अडीच कोटींची मागणी केली होती. याबाबत मी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना आरोपीला अटक केली आहे, असं दानवे यांनी सांगितलं.
(नक्की वाचा- शिवीगाळ, दमदाटी, धमकी; माझ्याशिवाय आहे कोण? अजित पवार गटाच्या आमदाराची दादागिरी, VIDEO)
आरोपी आर्मीमध्ये तो जवान आहे. जम्मू काश्मीरमध्ये त्याची सध्या पोस्टिंग आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं. म्हणून त्याने थापा मारल्या आहेत, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली. ईव्हीएमबाबत त्याला कुठलेही ज्ञान नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे त्याने पैसे मागितले होते. दानवे यांच्या बंधूंनी याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे, असंही छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world