
उत्तर प्रदेश एटीएसच्या टीमने पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली रामपूरचा व्यावसायिक शहजाद याला मुरादाबादमधून अटक केली आहे. ताब्यात घेतलेला व्यावसायिक भारत पाकिस्तानमध्ये कॉस्मेटिक, कपडे, मसालेंचा बेकायदेशीर व्यवसाय करीत होता. याच्याआड तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठीही काम करीत होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एटीएस उत्तर प्रदेशातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहजाद नावाची एक व्यक्ती भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तस्करीचं काम करतो. याला पाकिस्तानी एजन्सी आयएसआयचं संरक्षण होतं. शहजाग हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करीत होता आणि देश-विदेशातील कृत्यांमध्ये सामील होता.
नक्की वाचा - Who is Jyoti Malhotra: भारतातून फिरायला गेली, पाकिस्तानची हेर झाली, कोण आहे ज्योती मल्होत्रा?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहजाद गेल्या अनेक वर्षांत पाकिस्तानातून ये-जा केली आहे. लपून-छपून तो भारत आणि पाकिस्तानमध्ये कॉस्मेटिक्स, कपडे, मसाले आणि अन्य सामानं बेकायदेशीररित्या सीमेच्या पलीकडे ने-आण करीत होता आणि याच्या आड पाकिस्तान गुप्तचर संघटना आयएसआयसाठी काम करीत होता. शहजाग याचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंट्सशी चांगले संबंध आहेत, तो वारंवार यांच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे. याशिवाय शहजाद पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या आदेशानुसार भारतातील त्यांच्या एजंटना पैसे पुरवत होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world