सुरज कसबे, पुणे:
Pune Crime: पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात पुण्यात जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील सूस-पाषाण रस्त्यावर जमिनीच्या वादातून मारामारी आणि गोळीबार केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्यासह एकाला बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Mumbai Rain LIVE: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग! पश्चिम रेल्वे खोळंबली; वाचा LIVE अपडेट्स
पुण्यात गोळीबार, शिवसेनेचा जिल्हाप्रमुख अटकेत
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सूस-पाषाण रोडवरील एका वादग्रस्त जमिनीचा ताबा घेण्यासाठी चांदेरे हे रात्री एकच्या सुमारास गेले होते. तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांशी त्यांचा जोरदार वाद झाला, ज्याचे पर्यावसान पुढे हाणामारीत झाले. या राड्यात चांदेरे यांनी आपल्या जवळील पिस्तूलमधून गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलत बाळासाहेब चांदेरे, त्यांचा एक साथीदार आणि गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त केले आहे. या खळबळजनक प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
करमाळा पोलीस स्टेशनबाहेर फ्री स्टाईल हाणामारी
दुसरीकडे, करमाळा पोलीस स्टेशनच्या समोर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. मुस्लिम धर्मियांच्या दोन गटात ही हाणामारी झाली. नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या जुन्या वादाच्या कारणातून पोलीस स्टेशनच्या समोर हाणामारी झाल्याचे पुढे येत आहे. या फ्री स्टाईल मारामारीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून.. यामध्ये पोलिसांच्या मध्यस्थीने ही मारामारी नियंत्रणात आली.
Siya Goyal: पोलीस कोठडीतही माज! सियाचे अश्लील हावभाव; कॅमेऱ्यासमोर केलं असं कृत्य; संतापजनक VIDEO
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world