जाहिरात

"वनटाईम 10 लाख दे..", माथाडी कामगारांच्या टोळीने अभियंत्याला केली मारहाण, हिरानंदानीत मिटिंग अन् बरंच काही..

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्पेस एचव्हएसी सिस्टम्स प्रा.लि.या कंपनीत काम करणाऱ्या प्रकल्प अभियंत्याला माथाडी कामगारांच्या टोळीने खंडणी मागून बेदम मारहाण केली.

"वनटाईम 10 लाख दे..", माथाडी कामगारांच्या टोळीने अभियंत्याला केली मारहाण, हिरानंदानीत मिटिंग अन् बरंच काही..
Mumbai Crime News Today
मुंबई:

Mumbai Crime News : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्पेस एचव्हएसी सिस्टम्स प्रा.लि.या कंपनीत काम करणाऱ्या प्रकल्प अभियंत्याला माथाडी कामगारांच्या टोळीने खंडणी मागून बेदम मारहाण केली. विशेष विजय जाधव असं या अभियंत्यांचं नाव आहे. याप्रकरणी पवई पोलीस स्टेशनमध्ये सहा आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता 308(2) आणि 308 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास कदम, दशरथ घाडी अशी दोन आरोपींची नावं आहेत. तर इतर चार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष खल्दाकर यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास सुरु आहे. 

विशेष विजय जाधव यांनी एफआयआरमध्ये म्हटलंय की, मागील 3 महिन्यांपासून आमच्या कंपनीने आएफएफ कंपनी,17 वा माळा, सिग्नस बिल्डींग, सर्व्हे नं-71ए,कैलासनगर,मयुरनगर पासपोली,पवई,मुंबई-87 या ठिकाणी एसी बसविण्याचे काम घेतले आहे. तेथे सध्या काम चालू आहे. मागील 3 महिन्यांपूर्वी एका दिवशी या ठिकाणी पत्रा व एसीचे युनिट घेवून एक ट्रान्सपोर्टची गाडी आली होती. त्यावेळी माथाडी कामगार विकास कदम आणि इतर 3 जण आले. त्यांनी ते माथाडीचे लोक असून ते टोळी क्रमांक एम/463व एम/359 याचे मुकादम आहेत.जर आम्हाला यापुढे आमचे सामान सामान घेवून आलेली गाडी खाली करावयाची असेल तर त्यांना एकूण 10 लाख रुपये द्यावे लागतील. तसेच गाडी खाली करू किंवा नाही करू, पण ही रक्कम द्यावीच लागेल, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आमच्या कंपनीने याला नकार दिला. त्यानंतर धातु व कागद बाजार आणि दुकाने माथाडी कामगार मंडळ, बृहन्मुबई  माथाडी बोर्डाच्या अभियंता गुंजन पिसाळ तपासणीसाठी साईटवर आल्या. 

नक्की वाचा >> Pune News : वडिलांनी रात्री मोबाईल तपासताच नको ते घडलं, महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

हिरानंदानी पवई येथे मिटिंग झाली अन् पुढे जे घडलं..

त्यावेळी त्यांनी सांगितलं की, नमुद टोळी क्रमांक एम/463व एम/359 या माथाडी कामगाराकडून काम करून घ्यावे लागेल. तसेच रजिस्ट्रेशन नसलेल्या टोळीकडून काम करता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. परंत, ही टोळी नियमानुसार कामाचे रेट लावत नसून अधिकचे पैसे मागत आहे. नियमाप्रमाणे तुमच्याकडून कामाच्या रेटप्रमाणे पैसे घेतले जातील, असं त्या म्हणाल्या.त्यानंतर आम्ही आमच्या कंपनी बोर्डाकडे रजिस्ट्रेशन करून घेतलं.त्यानुसार दोन्ही टोळीकडून काम करण्यास सुरूवात केली. दोन महिने झाल्यानंतर आम्हाला विकास कदम आणि इतर जणांनी तीन महिन्याचे एकूण 4 लाख 50 हजाराचे बिल झाल्याचं सांगितलं. त्यानंतर आम्ही त्यांना हे बिल कामाप्रणामे आणि बोर्डाच्या नियमाप्रमाणे नसल्याचं सांगितलं. त्यानंतर विकास कदमने आमचे बॉसल दशरथ घाडी निर्णय घेतील असं सांगितलं. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2026 रोजी विकास कदस आणि त्याचा बॉस दशरथ घाडी यांच्यासोबत हिरानंदानी पवई येथे मिटिंग झाली. 'जे काही बिल दिले आहे ते पुर्णपणे दयावे लागेल, असं दशरथ घाडी यांनी मला सांगितलं. 

त्यावर मी म्हणालो, तुम्ही जे बिल दिले आहे ते नियमाप्रमाणे नसून जास्तीचे आहे. त्यानंतर घाडी म्हणाला, तू जास्त शहाणापणा शिकवू नकोस, मी कोण आहे तुला माहित नाही. माथाडी कामगारांचा बॉस आहे. मी जर ठरविले तर तुझे काम होउ देणार नाही.गाडी जर सामान उतरण्यासाठी आली तर फटके खाल, असं म्हणत दशरथने मला मारहाण केली.तसच त्याच्यासोबत असलेल्या तीन-चार लोकांनी माझ्या अंगावर धावत येऊन मला शिविगाळ केली आणि मला धमकावलं. त्यानंतर मी गुंजन पिसाळ यांच्याकडे तक्रार केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की, बिलातील रकमेपैकी काहीतरी रक्कम भरा म्हणजे त्यांचे आणि तुमचे सबंध चांगले होतील. त्यांनी मला 3 बिले दिली असता, त्यांनी आम्हाला दिलेल्या एकूण 4.50 लाखांपैकी 1,13,500 रुपये आम्ही त्यांना दिले.

नक्की वाचा >> Kalyan News : हायप्रोफाईल सोसायटीतील रहिवासी संतापले, महापालिकेमुळे 'त्या' 112 कुटुंबावर वणवण भटकण्याची वेळ

"वनटाईम 10 लाख रूपये दयावे लागतील, नाहीतर.."

तरीही विकास कदम व इतर लोकांनी माझ्याकडे पूर्ण रक्कम मागितली. तेव्हा मी गुंजन पिसाळ यांना याबाबत सांगितलं. त्यानंतर त्यांनी विकास कदम यांना संपर्क करण्यास सांगितलं. त्यावर मी विकास कदम यांना फोनदवारे संपर्क केला. त्यानंतर तो म्हणाला,आम्ही बोर्डाचे काहीही ऐकणार नाही. तुला 4.50 लाख रूपये दयावे लागतील. आमचे बॉस दशरथ घाडी यांच्याशी बोलून घे. त्यांनी मला दशरथ घाडी यांचा मोबाईल नंबर दिला. मी त्यांना संपर्क केला. त्यानंतर त्यांनीही मला सर्व रक्कम द्यावी लागेल अन्यथा वनटाईम 10 लाख रूपये दयावे लागतील, नाहीतर काम करू देणार नाही, असं सांगितलं. त्यानंतर त्या लोकांनी मागील 8 दिवसांपासून आमची एकही मालाची गाडी साईटवर येऊ दिली नाही. त्यामुळे आमचे खूप नुकसान झालं आहे. 

तरी 01 जानेवारी 2026 वेळ 00.00 ते आज दि. 19/03/2026 वेळ 16.00 पर्यंत आमचे कंपनीने काम घेतलेल्या आएफएफ कंपनी, 17 वा माळा, सिग्नस बिल्डींग, सर्व्हे नं-71ए, कैलासनगर, मयुरनग्र पासपोली, पवई, मुंबई-87 या साईटवर माल उतरण्याचे काम करणारे टोळी क्रमांक एम/463व एम/359 चे कामगार दशरथ घाडी याने मला हाताने मारहाण केली. तसेच विकास कदम व इतर तीन ते चार अनोळखी इसम यांनी भीती घालून इजा करण्याची धमकी देवून आमचे नियमाप्रमाणे माथाडी कामाचे पैसे न घेता अप्रामाणिकपणाने जास्तीचे पैसे देण्यास प्रवृत्त केले. तसेच माथाडीचे कोणतेही काम न करता उलट आमचे कंपनीचे साईटवरील माल खाली करण्यासाठी 10 लाखांची खंडणी आमच्या कंपनीकडून मागितली. त्यामुळे मी मुकादम विकास कदम,दशरथ घाडी व इतर तीन ते चार अनोळखी इसम यांचेविरोधात कायदेशीर कारवाईसाठी तक्रार करत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com